Перейти к содержимому

जरांगे विरुद्ध सरकार! आझाद मैदानाची परवानगी नाकारली, १६ दिवसांचं उपोषण, सलाईन आणि पाणी बंद,

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

जरांगे विरुद्ध सरकार! आझाद मैदानाची परवानगी नाकारली, १६ दिवसांचं उपोषण, सलाईन आणि पाणी बंद,

132 033 просмотра · 1 день назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,44 млн подписчиков
132 033 просмотра · 1 день назад
१६ दिवस उपोषण… आणि आता थेट सरकारला आव्हान! मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात आज, १३ सप्टेंबरला मोठा ट्विस्ट आला आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर १९ सप्टेंबरला उपोषण करण्यासाठी जरांगेंनी ५ हजार लोकांसह परवानगी मागितली होती… पण आता पोलिसांनी त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे! दुसरीकडे जरांगे मात्र परवानगी नाकारली तरी मुंबईला जाणार यावर ठाम आहेत. म्हणजे एकीकडे सरकार आणि पोलीस म्हणतायत, कायदा-सुव्यवस्था, गणेशोत्सव आणि मुंबईतील गर्दी लक्षात घेता परवानगी देता येणार नाही. आणि दुसरीकडे “गेल्या वर्षी परवानगी दिली, मग यंदा का नाही? आंदोलन सुरू होण्याआधीच आम्ही नियम तोडणार, असं कसं ठरवलं?” असा जरांगेंनी सवाल विचारला आहे. त्यामुळं आजची परिस्थिती इतकी तापली आहे की आता हा फक्त आरक्षणाचा प्रश्न राहिलेला नाही. तर, हा थेट जरांगे विरुद्ध सरकार असा संघर्ष बनतोय का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न , १५ सप्टेंबरला जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले, तर सरकार त्यांना अडवणार की शेवटच्या क्षणी पुन्हा चर्चेचा दरवाजा उघडणार? इथपर्यंत येऊन पोहचला आहे. महत्त्वाचं म्हणजे सरकार म्हणतंय की जरांगेंच्या १४ पैकी १२ मागण्या पूर्ण झाल्या आहेत. तर, जरांगे म्हणताय त्याची अंमलबजावणी कायद्यांच्या पुराव्यातून दाखवा. त्यामुळं मराठा आरक्षणाचा हा लढा आता किती मोठा होणार आणि कसं वळण घेणार हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. तेव्हा जरांगेंच्या समन्वयांनी आंदोलनासाठी कोणत्या अटींचे पालन करून म्हणून परवानगी मागितली होती, पोलिसांनी का नाकारली, त्यानंतर आता जरांगेंनी कोणती व्यक्त केली आहे आणि सर्वात महत्त्वाचं मुद्दा सरकार जरांगे आणि मराठा आंदोलकांना १५ सप्टेंबरला मुंबईकडे निघाले तर सरकार त्यांना अडवणार की चर्चा करून मार्ग काढणार? आणि जरांगे मुंबईत पोहोचलेच, तर पुढे काय होणार? हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. #ManojJarangePatil #ManojJarange #JarangePatil #MarathaReservation #MarathaAarakshan #MarathaAndolan #MarathaProtest #MarathaReservation2026 #JarangeMumbaiMarch #MumbaiMarch #AzadMaidan #MumbaiPolice #JarangeHungerStrike #MarathaReservationNews #MaharashtraNews #MaharashtraPolitics #DevendraFadnavis #EknathShinde After 16 days of hunger strike, Manoj Jarange Patil’s Maratha reservation agitation has reached a critical stage. Jarange had sought permission for around 5,000 protesters to hold an indefinite hunger strike at Mumbai’s Azad Maidan from September 19, but Mumbai Police have denied permission citing law and order, traffic and the Ganesh festival. Jarange, however, remains firm on marching towards Mumbai from Antarwali Sarati on September 15. While the government claims that 12 of his 14 demands have been addressed, Jarange is demanding proof of actual legal implementation. Will the government stop the march or reopen talks? And if Jarange reaches Mumbai, what happens next?