गीत सुमनांजली रक्षाबंधन विशेष सांघिक गीत देशभक्ती भावनेची राखी करी बांधूया
netra phadke
0:00 / 0:00
गीत सुमनांजली रक्षाबंधन विशेष सांघिक गीत देशभक्ती भावनेची राखी करी बांधूया
378 просмотров · 10 дней назад
netra phadke
117 подписчиков
378 просмотров · 10 дней назад
90 दिनी नऊ जणी 90 गाणी ऐकू साऱ्याजणी
देशभक्ती भावनेची राखी करी बांधूया
एक विचारात सारख्या मातृभूमी गुंफूया ||धृ||
आमुची ही जन्मभूमी आम्ही भारत कन्यका
वाढविते धरणीमाय सार्थ आम्ही बालिका
सेवा हिची करण्याची आण आम्ही घेऊया.
समरांगणी बिजली परि नारी इथे चमकल्या
राणी लक्ष्मी, दुर्गावती, चेन्नमा ही तळपल्या
वीर भूमी रक्षणास नित्य सिद्ध राहूया
वेदवती, मैत्रेयी, गार्गी,ब्रहवादिनी
भारतात किर्तीवंत कितीक ज्ञानदायिनी
अमोल ज्ञान मिळविण्यास व्रती बनून राहूया.
पांडवांची माय कुंती धन्य जिजा माऊली
उत्तरा नी द्रौपदी शोभतात भूतळी
वीर पुत्री वीर पत्नी वीर माय होऊया.
पतिव्रता अनसुया, सीतामाई, सावित्री
मीरा, जनी, कान्होपात्रा भूषविली धरित्री
नव पिढीला संस्कारूनी धर्म तेज राखूया.