Перейти к содержимому

ना मैदा, ना साखर! 😍 महिनाभर टिकणारी खमंग आणि खुसखुशीत तिळगुळाची करंजी | खास दिवाळी फराळ

kitchen & Dhruv vlogs

0:00 / 0:00

ना मैदा, ना साखर! 😍 महिनाभर टिकणारी खमंग आणि खुसखुशीत तिळगुळाची करंजी | खास दिवाळी फराळ

122 просмотра · 6 дн. назад
kitchen & Dhruv vlogs
132 подписчика
122 просмотра · 6 дн. назад
साहित्य करंजीच्या आवरणासाठी: 2 वाटी रवा चवीनुसार थोडे मीठ 2 ते 3 चमचे तूप आवश्यकतेनुसार पाणी तिळगुळाच्या सारणासाठी: 2 वाटी पांढरे तीळ 2 वाटी गूळ कृती 1. करंजीची उकड तया 1. करंजीची उकड तयार करणे सर्वप्रथम एका भांड्यामध्ये दोन वाटी रवा घ्यावा. त्यामध्ये थोडे मीठ आणि दोन ते तीन चमचे तूप घालावे. थोडे थोडे पाणी घालून रवा छान भिजवून घ्यावा. आता हे मिश्रण 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवावे, जेणेकरून रवा छान फुलून येईल. 2. मिक्सरमध्ये पीठ तयार करणे रवा भिजल्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या पल्स मोडवर फिरवून घ्यावेत. थोड्या थोड्या प्रमाणात फिरवल्याने रव्याचे छान बारीक, मऊ आणि मैद्यासारखे पीठ तयार होते. 3. तिळगुळाचे सारण तयार करणे आता दोन वाटी तीळ मंद आचेवर छान खमंग भाजून घ्यावेत. तीळ थंड झाल्यावर त्यामध्ये दोन वाटी गूळ घालावा. हे मिश्रण मिक्सरमध्ये पल्स मोडवर फिरवून घ्यावे. अशा प्रकारे छान खमंग तिळगुळाचे सारण तयार होई तयार केलेल्या पिठाची छोटी छोटी गोळी करून पुरीप्रमाणे लाटून घ्यावी. त्यामध्ये तयार केलेले तिळगुळाचे सारण भरावे. कडांना थोडे पाणी लावून व्यवस्थित बंद करावे आणि करंजीचा सुंदर आकार द्यावा. 5. तळणे तयार करंज्या मंद ते मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्याव्यात. पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवाव्यात.