Перейти к содержимому

कुरकुरीत खान्देशी लसूण मसाला शेव | लसूण-तिखट गाळून घ्या - साच्यात अडकत नाही, तुटत नाही | दिवाळी फराळ

Sunita's Kitchen

0:00 / 0:00

कुरकुरीत खान्देशी लसूण मसाला शेव | लसूण-तिखट गाळून घ्या - साच्यात अडकत नाही, तुटत नाही | दिवाळी फराळ

253 просмотра · 8 ч назад
Sunita's Kitchen
2,78 тыс. подписчиков
253 просмотра · 8 ч назад
🪔 दिवाळी फराळ स्पेशल — खान्देशी पद्धतीची लसूणी मसाल्याची कुरकुरीत शेव, सोडा न वापरता! लसूण शेव | लसूणी शेव | लसूणी मसाला शेव | तिखट शेव | Lasun Shev | Lasuni Masala Shev Recipe in Marathi | Garlic Sev शेव करताना साचा अडकतो, शेव मधेच तुटते किंवा तेलकट होते? सुनीताताईंची पद्धत: लसूण आणि लाल तिखट थोडं पाणी घालून बारीक वाटा आणि गाळून घ्या — फक्त ते मसाल्याचं पाणी पिठात घाला, म्हणजे लसणाचे कण साच्यात अडकत नाहीत. बेसन बारीक दळलेलं आणि चाळलेलं घ्या, पीठ साच्यात पाण्याचा हात लावून दाबून भरा — हवा राहिली तर शेव मधे मधे तुटते. आणि तेल छान तापलेलं असू द्या, नाहीतर शेव खाली बसते आणि तेलकट होते. ओवा, मिरे, जिरे कोरडे भाजून घातल्याने शेवेला येतो खान्देशी खमंगपणा. ⏱️ वेळ-क्रम 00:00 सुरुवात 00:13 साहित्य 00:35 लसूण-तिखटाचा मसाला 01:48 पीठ भिजवणे 03:45 साचा भरणे 04:35 शेव तळणे 06:29 तयार लसूणी मसाला शेव 🧾 साहित्य • बेसन (बारीक दळलेलं) — ५०० ग्रॅम • लसूण — ५० ग्रॅम • लाल तिखट — ४० ग्रॅम (कमी तिखट हवं असेल तर कमी घ्या) • तेल (मोहनासाठी, गरम करून) — ८० ग्रॅम • ओवा — १ चमचा • मिरे — १ चमचा • जिरे — १ चमचा • मीठ — चवीप्रमाणे • पाणी — लागेल तसं, थोडं थोडं • तेल — तळण्यासाठी 👩‍🍳 टिप्स • ओवा, मिरे, जिरे कोरडे भाजून बारीक पूड करा. • लसूण-तिखटाची पेस्ट गाळून घ्या, जाडसर उरलेलं काढून टाका. • बेसन चाळून घ्या — गोळे मोडतात आणि साच्यात अडकत नाहीत. • पीठ खूप कडक नको, खूप नरम नको — नरम झालं तर शेव गोल गोल पडते. • तेल तापलं का ते पाहायला पिठाची गोळी टाका — लगेच वर आली की तेल तयार. • चकती जाड नको, नाहीतर मधे कच्ची राहते. तोडताना साचा उलटा फिरवा. • फेस पूर्ण थांबला की शेव तयार. 🕒 एकूण वेळ: तयारी १० मिनिटे + तळणे (एक चकती साधारण १ मिनिट) 🍛 याच शेवेची खान्देशी शेव भाजी:    • खान्देशी शेव भाजी — शेव आधी घातली तर गाळ ह...   🪔 आमचा खान्देशी दिवाळी फराळ: दराबा लाडू, करंजी, अनारसे, शंकरपाळी, रवा बेसन लाडू, खजूर मिठाई — Diwali Faral playlist मध्ये. सुनीताज किचन आवडलं का? चॅनल सबस्क्राईब करा आणि 🔔 घंटा दाबा — पारंपरिक खान्देशी आणि मराठी रेसिपी 🙏 #लसूणशेव #lasunshev #दिवाळीफराळ #masalashev #शेवरेसिपी #sunitaskitchen #khandeshirecipe #khandeshspecial #सुनीतासकिचन #खान्देशी