Перейти к содержимому

दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सर यांचे छत्रपती शिवाजी महाराजांन वरील ऐसा राजा होणे नाही व्याख्यान _/\_

Gadwat

0:00 / 0:00

दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सर यांचे छत्रपती शिवाजी महाराजांन वरील ऐसा राजा होणे नाही व्याख्यान _/\_

36 609 просмотров · 7 лет назад
Gadwat
5,39 тыс. подписчиков
36 609 просмотров · 7 лет назад
लढाऊ जमातीला शक्ती देणारी महाराष्ट्राचं कुलदैवत "आदिशक्ती तुळजाभवानी" आणि महाराष्ट्राचं मर्दांनी दैवत "छत्रपती शिवाजी महाराज"....... अशी आपल्या व्याख्यानाची सुरुवात करत पुढील अडीच- तीन तास अवघे सभागृह जिंकणारे भाऊ अक्षरशः बरसत असत.... "भाऊंच्या" म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सरांच्या अमोघ वाणीतून छत्रपती शिवराय ऐकणं म्हणजे दैवी अनुभव होता. छत्रपती शिवाजी महाराज ह्या पिढीला भाउंनी उलगडून समजावून सांगितले. महाराजांच्या गुणांकडे अनुकरणीय नजरेने पाहायला शिकवले. गडवाट आयोजित "ऐसा राजा होणे नाही" ह्या कार्यक्रमात तो अनुभव आम्हा सर्वांना घेता आला. भारतातले गडकिल्ले आणि क्रांतिकारकांच्या इतिहासाच्या क्षेत्रात भरीव आणि अमर्त्य योगदान देणारा हा तेजस्वी ध्रुव तारा बरोबर एक वर्षांपूर्वी निखळला. अनेकांच्या मनात कर्तृत्वाची धमक पेरून गेलेला हा अवलिया आज देहानं जरी आपल्यात नसला तरी त्यांच्या सह्याद्रीएवढ्या कार्यरूपात चिरंतर जिवंत असणार आहे. मांडे सरांच्या कार्याच्या तेजस्वी स्मृती जागवण्यासाठी त्यांच्या व्याख्यानाच्या चित्रींफितींच्या रूपाने आपल्यातल्या अनेकांच्या आयुष्यात हुकलेल्या अश्या अमूल्य क्षणांना परत एकदा मंत्रमुग्ध करण्याचा हा छोटासा प्रयत्न गडवाट परिवार आपल्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून करत आहे. गडवाट प्रवास सह्याद्रीचा तर्फे आयोजित "ऐसा राजा होणे नाही" ह्या कार्यक्रमाचे व्हिडियो चित्रीकरण आज आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून देऊन, संपूर्ण गडवाट परिवार आणि सर्व गडवाटकरी भाऊंना एक छोटीशी सुमनांजली अर्पण करत आहोत.. जय शिवराय 🙏