Sumitra Kaki Kote Passes Away | अडीच हजार लेकींचं कन्यादान करणा-या सुमित्रा काकी काळाच्या पडद्याआड!
SP 24 TAAS
0:00 / 0:00
Sumitra Kaki Kote Passes Away | अडीच हजार लेकींचं कन्यादान करणा-या सुमित्रा काकी काळाच्या पडद्याआड!
16 881 просмотр · 10 ч назад
SP 24 TAAS
376 тыс. подписчиков
16 881 просмотр · 10 ч назад
Sumitra Kaki Kote Passes Away | अडीच हजार लेकींचं कन्यादान करणा-या सुमित्रा काकी काळाच्या पडद्याआड! ..
Kailas Bapu Kote Shirdi, Radhakrishna Vikhe Patil, Sumitra Kailas Kote, Shirdi News, Shirdi, Kote Patil Shirdi, Ahilyanagar News, Shirdi Nagarparishad, Sai Trust Shirdi
काही माणसं आपल्या पदामुळे मोठी होत नाहीत… तर आपल्या मायेने, माणुसकीने आणि सेवाभावाने हजारो हृदयांत कायमचं घर करतात…!
शिर्डीच्या सामाजिक जीवनात असंच अढळ स्थान निर्माण करणाऱ्या… हजारो लेकींच्या डोक्यावर आईच्या मायेचा हात ठेवणाऱ्या… सुमित्रा कैलासबापू कोते आज काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत…
गोरगरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नाची चिंता दूर व्हावी… कोणत्याही आई-वडिलांवर मुलीच्या लग्नाचा आर्थिक भार पडू नये… या उदात्त भावनेतून त्यांनी पती कैलासबापू कोते यांच्या साथीने सामुदायिक विवाह सोहळ्याची परंपरा सुरू केली…
२००१ मध्ये सुरू झालेल्या या सेवायज्ञाला यंदा २५ वर्षे पूर्ण झाली… या पंचवीस वर्षांच्या प्रवासात तब्बल अडीच हजार जोडपी विवाहबंधनात अडकली… आणि या प्रत्येक विवाहात सुमित्रा काकींनी एका आईच्या ममतेने अडीच हजार मुलींचं कन्यादान केलं…
जात-धर्माच्या भिंती ओलांडून सर्वधर्मीय जोडप्यांचे विवाह घडवत त्यांनी साईबाबांच्या ‘सबका मालिक एक’ या विचारांचा खऱ्या अर्थाने जागर केला…
शिर्डीच्या प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा… साईबाबा संस्थानच्या माजी विश्वस्त… अशी अनेक मानाची पदं त्यांनी भूषवली… मात्र, पदापेक्षाही हजारो लेकींची आई म्हणून त्यांनी मिळवलेलं स्थान अधिक मोठं होतं…
आज त्या आपल्यात नाहीत… मात्र, त्यांनी कन्यादान केलेल्या हजारो लेकींच्या संसारात… त्यांच्या आठवणींच्या रूपाने सुमित्रा काकींची माया सदैव जिवंत राहील…
एका मातेचं जाणं… हजारो लेकींच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपणं आहे…
सुमित्रा काकींना भावपूर्ण श्रद्धांजली…!
#sp24taas #shirdinews #shirdi #ahilyanagar #radhakrishnavikhepatil #ahilyanagarnews #sujayvikhepatil