Перейти к содержимому

आमदारांच्या आरोपांना बालाजी संस्थानचे प्रत्युत्तर; ‘एक रुपयाचाही गैरवापर सिद्ध झाल्यास राजीनामा देऊ

Maharashtra maza live

0:00 / 0:00

आमदारांच्या आरोपांना बालाजी संस्थानचे प्रत्युत्तर; ‘एक रुपयाचाही गैरवापर सिद्ध झाल्यास राजीनामा देऊ

2 911 просмотров · 12 дн. назад
Maharashtra maza live
318 подписчиков
2 911 просмотров · 12 дн. назад
श्री बालाजी संस्थानच्या कथित गैरव्यवहार, अपहार व भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून एरंडोल-पारोळा मतदारसंघाचे आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांनी दि. ४ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत एसआयटी चौकशीची मागणी केली होती. या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी श्री बालाजी संस्थानच्या वतीने दि. ५ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. संस्थानचे विश्वस्त तथा माजी खासदार नानासाहेब ए. टी. पाटील यांनी आमदारांचे सर्व आरोप फेटाळून लावले. संस्थानकडे सर्व व्यवहारांचे पुरावे उपलब्ध असून, चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. *बालाजी पार्कच्या खर्चाबाबत स्पष्टीकरण -* बालाजी पार्कसाठी संस्थानच्या माध्यमातून जवळपास १० लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे ए. टी. पाटील यांनी सांगितले. पार्कच्या भूमिपूजनासाठी कोणालाही निमंत्रण देण्यात आले नव्हते, हे विरोधकांनी सिद्ध करून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले. *रथोत्सवानंतर हिशोब ऑडिटमध्ये दाखल -* रथोत्सवाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर संस्थानच्या सर्व खर्चाचा हिशोब तयार करून तो ऑडिटमध्ये दाखल केला जात असल्याचे ए. टी. पाटील यांनी स्पष्ट केले. *ॲम्ब्युलन्सच्या व्यवहारावरही स्पष्टीकरण -* ॲम्ब्युलन्स संस्थेच्या नावावर करता न आल्याबाबत काही तांत्रिक अडचणी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ॲम्ब्युलन्सच्या व्यवहारात कोणताही गैरव्यवहार झालेला नसल्याचा दावा त्यांनी केला. *‘एक रुपयाचा गैरवापर सिद्ध झाल्यास राजीनामा’ -* संस्थानच्या व्यवहारात एक रुपयाचाही गैरवापर झाल्याचे सिद्ध झाल्यास संस्थानचे सर्व ट्रस्टी राजीनामा देतील, असे खुलं आव्हान नानासाहेब ए. टी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले. या पत्रकार परिषदेमुळे श्री बालाजी संस्थानच्या कारभारावरून सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांना नवे वळण मिळाले असून, आता आमदार अमोलदादा पाटील यांची पुढील भूमिका काय राहते, याकडे लक्ष लागले आहे. *— महाराष्ट्र माझा लाईव्ह न्यूज, पारोळा | संपादक - जितेंद्र एम. वानखेडे