विधानसभेत बॅकफुटवर गेलेल्या Sharad Pawar यांचा पदवीधर निवडणुकीत कमबॅक, दोन्ही जागा कशा जिंकल्या?
BolBhidu
0:00 / 0:00
विधानसभेत बॅकफुटवर गेलेल्या Sharad Pawar यांचा पदवीधर निवडणुकीत कमबॅक, दोन्ही जागा कशा जिंकल्या?
19 859 просмотров · 2 часа назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
19 859 просмотров · 2 часа назад
#BolBhidu #HarshadaDeshmukh #PratapSinhPatil
पश्चिम महाराष्ट्र शरद पवारांचा बालेकिल्ला. पुणे जिल्हा पवारांचं होमपीच. साताऱ्यात पवारांचा होल्ड, कोल्हापुरात तर राष्ट्रवादीची जुनी ताकद, सोलापूर पवार एकहाती काढायचे आणि सांगलीची धुरा पवारांचे सेनापती वाहायचे. पण यंदाच्या विधानसभेला चित्र बदललं, सांगलीमध्ये जयंत पाटील आणि रोहित पाटील यांनी आपापले मतदारसंघ राखले, सोलापूरमध्ये चार आमदार निवडून आले असले, तरी त्यांचा वैयक्तिक करिष्मा महत्त्वाचा होता. पण सेटबॅक बसला इतर ३ जिल्ह्यांमध्ये, सातारा आणि कोल्हापूरमध्ये शरद पवारांचा एकही उमेदवार निवडून आला नाही, शरद पवारांचाच काय तर महाविकास आघाडीचा एकही उमेदवार निवडून आला नाही, पुण्यात सुद्धा पवारांना एकाच जागेवर समाधान मानावं लागलं. पश्चिम महाराष्ट्रातून शरद पवार बॅकफूटवर गेल्याची चर्चा सुरु झाली.पवारांच्या हातून सुटलेला गड फक्त पश्चिम महाराष्ट्रच नव्हता, तर मराठवाड्यात सुद्धा पवारांना आपली जादू राखता आली नाही. संपूर्ण मराठवाड्यात मिळून पवारांचा फक्त एक आमदार निवडून आला. महानगरपालिका, पंचायत समिती इथंही पवार फॅक्टर मायनसच होता. मग लागल्या शिक्षक आणि पदवीधरच्या निवडणुका, शरद पवारांनी मैदानात उमेदवार उतरवले दोन, त्यांचे उमेदवार निवडून आले दोन. पुणे पदवीधर मतदारसंघातून हर्षदा देशमुख आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून प्रतापसिंह पाटील. शरद पवारांनी दोन एक्क्यांच्या जोरावर रम्मी लावली, कशी तेच सांगणारा हा व्हिडीओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/