Vidhan Parishad Result: काँग्रेसने नागपूरचं मैदान मारलं, राज्यात MVA चा विजय, पाचही जागांचे निकाल
BolBhidu
0:00 / 0:00
Vidhan Parishad Result: काँग्रेसने नागपूरचं मैदान मारलं, राज्यात MVA चा विजय, पाचही जागांचे निकाल
377 798 просмотров · 10 часов назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
377 798 просмотров · 10 часов назад
#BolBhidu #VidhaParishadResult #ShikshakPadvidhar
विधान परिषदेची शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणूक. २३ ऑक्टोबरला या निवडणुकीच्या शिक्षक आणि पदवीधरच्या ५ जागांसाठी राज्यात मतदान झालं. आता इतर वेळी या निवडणुकांची फारशी चर्चा होत नाही. पण यावेळी मात्र या निवडणुकांना रंगत आली होती. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूने ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली. दोन्ही बाजूच्या पक्षांनी काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती करुन आपापली ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला, तर काही ठिकाणी नाराजीनाट्य रंगलं. पण या सगळ्या राड्यात बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांनी मात्र दोन्ही बाजूंचं टेन्शन वाढवलं. मराठवाड्यात रीलस्टारने प्रस्थापितांना गिळलं तर नागपूरात कराळे मास्तरांनी सोपा वाटणारा निकाल गदागदा हलवला. तब्बल 33 तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या मतमोजणीनंतर बुधवारी संध्याकाळी पाच पैकी ४ जागांचे निकाल स्पष्ट झाले तर नागपूर पदवीधर मतदारसंघात अजूनही कांटे की टक्कर सुरू असून निकाल यायला पहाट उजाडेल असं सांगण्यात येतंय. प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचा स्कोर सध्या २-२ असा आहे. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत विजयाचा गुलाल कोणी उधळला आणि कोणी कोणाचा गेम केला, विधान परिषदेच्या पाचही जागांचे निकाल सांगणारा हा व्हिडिओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/