Перейти к содержимому

बातमीपत्र:3/8/26बीड शहरात उच्चभ्रू वस्तीत पोलिसांचा वेश्या व्यवसाय अड्ड्यावर छापा;तीन रंगेहाथ पकडले

युवा दर्पण लाईव्ह Yuva Darpan Live

0:00 / 0:00

बातमीपत्र:3/8/26बीड शहरात उच्चभ्रू वस्तीत पोलिसांचा वेश्या व्यवसाय अड्ड्यावर छापा;तीन रंगेहाथ पकडले

15 421 просмотр · 5 дней назад
युवा दर्पण लाईव्ह Yuva Darpan Live
20,9 тыс. подписчиков
15 421 просмотр · 5 дней назад
बीड शहरातील हाय प्रोफाईल भागात कुंटण खाण्याचा परिविक्षाधीन डीवायएसपी पथक, अनैतिक मानवी वाहतूक शाखा आणि शिवाजीनगर पोलीस यांच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई करत उच्चभ्रू वस्तीमध्ये एका कुंटण खाण्यावर छापा टाकत एका पीडित महिलेची सुटका केली आणि एक आंटी व दोन दलाल अशा तिघांना अटक करण्यात आली, बीड शहरातील चंपावती शाळेच्या पाठीमागे उच्चभ्रू वसाहतीत जवाहर कॉलनी, भक्ती कन्स्ट्रक्शन रोड परिसरात एका घरात बाहेरून महिला बोलावून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यावरून येएचटीयु बीड, परिविक्षाधीन डी वाय एस पी यांचे पथक आणि शिवाजीनगर पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई करत सदर ठिकाणी सापळा रुचून एक डमी ग्राहक पाठवला असता त्याच्याकडून इशारा मिळताच वेश्या व्यवसाय अड्ड्यावर छापा टाकण्यात आला, यामध्ये डमी ग्राहकाने दिलेले तीन हजार रुपये, महिला व मुलींना ने आन करण्यासाठी वापरण्यात येणारी दुचाकी व इतर साहित्य असे एकूण पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आला , तसेच यावेळी एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली, तर वेश्या व्यवसाय करून घेणारे विष्णू लक्ष्मण शिंदे वय 48 वर्षे राहणार माळीवेस बीड, शशिकला विष्णू धांडे वय 60 वर्षे राहणार कबाड गल्ली बीड, सचिन विष्णू धांडे वय 37 वर्ष राहणार कबाड गल्ली बीड यांना ताब्यात घेतले तर घर किरायाने देऊन वेश्या व्यवसायाला जागा उपलब्ध करून दिली म्हणून घर मालक शार्दुल दिलीपराव देशपांडे याचाही आरोपी मध्ये समावेश करण्यात आला आहे, याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ हे करत आहेत, दरम्यान या कारवाईने बिड शहरात एकच खळबळ उडाली आहे.