बातमीपत्र:7/9/26:सावधान!आणखी एक दरोडेखोरांची टोळी जेरबंद;तर दुसऱ्या टोळीवर एसपीनी लावला मिनी मकोका
युवा दर्पण लाईव्ह Yuva Darpan Live
0:00 / 0:00
बातमीपत्र:7/9/26:सावधान!आणखी एक दरोडेखोरांची टोळी जेरबंद;तर दुसऱ्या टोळीवर एसपीनी लावला मिनी मकोका
4 493 просмотра · 1 день назад
युवा दर्पण लाईव्ह Yuva Darpan Live
20,9 тыс. подписчиков
4 493 просмотра · 1 день назад
पोलीस अधीक्षक श्री नवनीत काँवत यांनी बीड व धाराशिव जिल्ह्यात हैदोस घालणाऱ्या आरोपींच्या टोळीवर मिनी मकोका लावत मोठी कारवाई केली आहे, दिनांक सहा सात 2026 रोजी बीड तालुक्यातील येळम घाट येथे रमेश बाबासाहेब काळे यांच्या घरी अज्ञात आरोपींनी कुलपाचा खडीकोंडा तोडून घरात प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने व नगदी रक्कम असा एकूण सहा लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, या प्रकरणाचा प्राथमिक तपास नेकनूर ठाण्याचे पीएसआय पद्माकर आहेर यांनी केला होता तर त्या पुढील तपास श्री मंगेश साळवे प्रभारी अधिकारी नेकनुर पोलीस स्टेशन हे करत आहेत, या प्रकरणातील आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक करण्यात आले एकूण सहा आरोपींपैकी चार आरोपींना पकडण्यात यश आले आहे, यामध्ये प्रकाश उर्फ गुड्या शहाजी काळे वै 22 वर्षे राहणार मोहा वस्ती कळम जिल्हा धाराशिव, शहाजी शेषराव पवार वय पंचवीस वर्षे, संतोष बारीकराव शिंदे वय 22 वर्षे, दिनेश नागनाथ काळे वै 24 वर्षे, या चार आरोपींना अटक करण्यात आली असून पीसीआरदरम्यान आरोपीच्या ताब्यातून 32 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे तर इतर दोन निष्पन्न आरोपी अद्यापही फरार आहेत पोलीस त्यांचा कसोशीने शोध घेत आहे, यातील टोळीप्रमुख याने संघटित गुन्हेगाराची टोळी तयार करून संघटित रित्या बीड व शेजारच्या जिल्ह्यात आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून सदरचे गुन्हे हे शस्त्राचा धाक दाखवून केल्याचे निष्पन्न झाल्याने बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत काँवत यांनी नेकनुर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने, आरोपींवर मिनी मकोका लावण्याची परवानगी नेकनूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नेकनूर यांना देण्यात आली आहे, त्यामुळे गुन्हेगारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे, सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक, नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, एस डी पी केज, एलसीबी चे पी आर शिवाजी बंटेवाड , एपीआय मंगेश साळवे, पीएसआय पद्माकर आहेर, पीएसआय शंकर गलधर, सुधाकर जायभाय यांच्यासह एलसीबी चे ए एस आय अभिमन्यू अवताडे, बिबीशन चव्हाण, बबन सलगर यांनी मिळून केली तर भविष्यातही अशाच प्रकारच्या गुन्हेगारांच्या डोळ्यावर मोक्का लावण्याची संकेत पोलीस अधीक्षक यांनी दिले आहे.