Перейти к содержимому

Cyclone Murasu: Arnab नंतर आता Murasu चक्रीवादळाचा धोका, पुणे, विदर्भासह कोणत्या भागांना अलर्ट ?

BolBhidu

0:00 / 0:00

Cyclone Murasu: Arnab नंतर आता Murasu चक्रीवादळाचा धोका, पुणे, विदर्भासह कोणत्या भागांना अलर्ट ?

83 479 просмотров · 8 ч назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
83 479 просмотров · 8 ч назад
#BolBhidu #CycloneMurasu #MaharashtraRains गेल्या काही दिवसांपासून भारताच्या पूर्व किनारपट्टीवर थैमान घातलेल्या अर्नब चक्रीवादळाच्या संकटातून आंध्र प्रदेश, ओडीशासह अनेक राज्य सावरत असताना आता बंगालच्या उपसागरात आणखी एक मोठं संकट उभं ठाकलंय. अर्नब चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरातुन मुरासू नावाचं नवीन चक्रीवादळ भारताच्या दिशेनं येतं आहे. अर्नब चक्रीवादळामुळे राज्याच्या हवामानात दोन दिवसांत वेगानं बदल घडून आले. या चक्रीवादळामुळे अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. आता मुरासु चक्रीवादळ वेगानं भारताच्या किनारपट्टीकडे सरकत असून, त्याचं रूपांतर भीषण चक्रीवादळात होण्याची शक्यता वर्तवली जातं आहे. हे वादळ ३ नोव्हेंबरला आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यावर धडकणार असून याचा ताशी वेग १०० ते १२० किलोमीटर पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या वादळाचा भीषण फटका आंध्रप्रदेश, ओडिशा यांसारख्या किनारपट्टीवरच्या राज्यांना बसेल. पण सोबतच महाराष्ट्रला सुद्धा याचे परिणाम जाणवतील, असं सांगितलं जात आहे. पण मुरासू चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या हवामानात कोणते मोठे बदल होणार आहेत? या चक्रीवादळामुळे नेमक्या कोणत्या भागांना धोका वर्तवला जात आहे? महाराष्ट्रात होणारा हा हवामानाचा बदल आणि पाऊस नेमके किती राहणार? आणि राज्याच्या कोणत्या भागांमध्ये पुढचे ४ दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे? सगळं काही सविस्तर जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/