General Winter मुळे Russia ला कोणीच हरवू शकत नाही का ? Napoleon, Adolf Hitler सोबत काय घडलं होतं
BolBhidu
0:00 / 0:00
General Winter मुळे Russia ला कोणीच हरवू शकत नाही का ? Napoleon, Adolf Hitler सोबत काय घडलं होतं
110 982 просмотра · 18 часов назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
110 982 просмотра · 18 часов назад
#BolBhidu #Russia #GeneralWinter
रशिया… १ कोटी ७१ लाख चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ असलेला जगातला सर्वात मोठा देश… एखादा शत्रू रशियावर चालून जरी आला तरी राजधानी मॉस्को आणि इतर मुख्य शहरांपर्यंत पोहोचायला शत्रूला हजारो किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. यामुळे शत्रूची पुरवठा साखळी आधीच कोलमडून पडते…रशियाची उत्तर आणि पूर्वेकडची बाजू बर्फाची तटबंदी बनून उभी आहे. उत्तरेला आर्क्टिक महासागर आणि पूर्वेला पॅसिफिक महासागर. त्यामुळे या बाजूंनी रशियावर आक्रमण करणं कोणत्याही शत्रूला अशक्यच. जेव्हा ६ लाखांचं सैन्य घेऊन निघालेला नेपोलियन बोनापार्ट रशियावर आक्रमण करायला गेला तेव्हा काही हजारांचं सैन्य घेऊन तो बाहेर पडला. ३ महिन्यांत रशियाला गुडघे टेकवायला निघालेल्या अडॉल्फ हिटलरला आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी किंमत याच रशियात येऊन चुकवावी लागली. जगातील मोठ मोठे हुकूमशहा जेव्हा जेव्हा रशियाच्या वेशीत शिरले, तेव्हा त्यांचा सामना रशियन फौजेसोबत होण्याआधी, जनरल विंटरशी व्हायचा. जगातील सर्वात मोठा अण्वस्त्रांचा साठा, लष्करी ताकद आणि हायपरसॉनिक मिसाईल्स असलेल्या रशियाला कोणीच हरवू का शकत नाही याचं उत्तर आहे त्याच्या कडाक्याच्या थंडीत. नेपोलियन पासून हिटलर पर्यंत रशियाला कोणी हरवू का शकलं नाही? असं काय आहे रशियाच्या या हवामानात? रशियाचा कडाक्याचा हिवाळा, ज्याला जगात जनरल विंटर म्हटलं जातं, तो खरंच रशियाची अजिंक्य ढाल आहे का? सविस्तर जाणून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/