मोटेगाव ते लातूर, सायकलवर फिरणारा प्राध्यापक कोचिंग माफिया कसा बनला?
Story Dot Com
0:00 / 0:00
मोटेगाव ते लातूर, सायकलवर फिरणारा प्राध्यापक कोचिंग माफिया कसा बनला?
32 979 просмотров · 3 месяца назад
Story Dot Com
447 тыс. подписчиков
32 979 просмотров · 3 месяца назад
#rcc #motegaonkar_sir #latur #neet2026 #neetpaperleakcase #storydotcom
आरसीसी… सुरुवातीला रेणुका केमिस्ट्री क्लासेस नावाने ओळख असलेल्या लातूरमधल्या या कोचिंग सेंटरची ओळख आरसीसी म्हणजेच रेणुकाई करिअर सेंटर अशी झाली. कारण, संचालक असलेले प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांची शिकवण्याची शैली, त्यांची मुलांना आवडणारी देहबोली आणि क्लासचं यश पाहून प्रचंड मोठं नाव होत गेलं आणि मग केमिस्ट्रीसोबतच बायोलॉजी आणि फिजिक्ससाठीही मोटेगावकरांनी नामवंत प्राध्यापक आणले. रेणापूर तालुक्यातल्या मोटेगावात एका शेतकरी कुटुंबात लहानाचे मोठे झालेले मोटेगावकर ९० च्या दशकात शिक्षण पूर्ण करुन कोचिंग क्लासेस घ्यायला लागले तेव्हा सायकलवरुन प्रवास करायचे, मुलांना शिकवायचे आणि शिकवण्याची शैली तेव्हापासूनच सगळ्यांना आवडायला लागली. भाड्याच्या खोलीत फक्त १० मुलांसह सुरु केलेला कोचिंग क्लास पुढच्या दोन दशकात महाराष्ट्रातला सर्वात मोठा कोचिंग हब बनला, लातूरची ओळखही या क्लासमुळे व्हायला लागली, शिवराज मोटेगावकर हे फक्त प्राध्यापक राहिले नाहीत तर मोटेगावकर हा लातूरमधला एक ब्रँड बनला.. डॉक्टर आणि इंजिनिअर व्हायचं तर मोटेगावकरांकडेच गेलं पाहिजे हे समीकरण मुलांच्या मनात सेट व्हायला लागलं. मोटेगावकरांनी लातूरनंतर पुणे, नांदेडसह राज्यभरात पाय पसरले आणि पाहता पाहता मोटेगावकर कोचिंग क्लासमधला सर्वात मोठा सम्राट बनले. पण याच मोटेगावकरांच्या मुलांना एवढं यश का मिळायचं, केमिस्ट्रीत पैकीच्या पैकी मार्क घेणारे मुलं लातुरातूनच का यायचे, दरवर्षी मोटेगावकरांचा केमिस्ट्रीचा निकाल आणि त्याची टक्केवारी ही आता नीट पेपरफुटीत ज्या केमिस्ट्रीचा पेपर सेट करणाऱ्या प्राध्यापकाला अटक करण्यात आलीय त्यासोबत जुळायला लागलीय.. मोटेगावकरांची गेल्या चार दिवसांपासून सातत्याने चौकशी सुरुय, मोटेगावकरांना पुण्यातल्या सीबीआय कार्यालयात दोन दिवस चौकशीसाठी ताब्यात घेतलं गेलंय, कदाचित अटकही होईल अशी चर्चाय, पण मोटेगावकरांच्या लिंक नेमक्या कुठून जुळल्यात, ज्या मोटेगावकरांची ओळख ब्रँड म्हणून होती त्यांना कोचिंग माफिया का म्हटलं जाऊ लागलंय त्याचीच स्टोरी मी या व्हिडीओत सांगणार आहे…
Join this channel to get access to perks:
/ @storydotcomofficial
Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com
स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.
Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.
आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -
Facebook - / officialstorydotcom
Instagram - / officialstorydotcom
X - https://x.com/storydotcomnews
Threads - https://www.threads.net/@officialstor...