Перейти к содержимому

Shivraj Motegaonkar Arrested: स्वतःच्या मुलाचा पेपर ते आर्थिक गैरव्यवहार, मोटेगावकर पूर्णपणे अडकला

BolBhidu

0:00 / 0:00

Shivraj Motegaonkar Arrested: स्वतःच्या मुलाचा पेपर ते आर्थिक गैरव्यवहार, मोटेगावकर पूर्णपणे अडकला

189 669 просмотров · 3 месяца назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
189 669 просмотров · 3 месяца назад
#BolBhidu #ShivrajMotegaonkar #NEETPaperLeak ३ मेला नीटचा पेपर झाला, २२ लाख विद्यार्थ्यांनी पेपर दिला. त्याच दिवशी संध्याकाळी राजस्थानच्या सीकरमध्ये एका शिक्षकाच्या मोबाईलवर एक पीडीएफ आली, पीडीएफमध्ये होती प्रश्नपत्रिका. नीटच्या पेपरमध्ये येऊ शकणारे संभाव्य प्रश्न, थोडक्यात गेस पेपर. या शिक्षकाने हा गेस पेपर तपासला, तेव्हा लक्षात आलं की नीटच्या पेपरमध्ये आलेले प्रश्न आणि या गेस पेपरमध्ये असलेले बहुतांश प्रश्न हे सारखेच होते, या शिक्षकाने तक्रार केली, प्रकरण राजस्थान पोलिसांकडे गेलं, तपासात लिंक लागत गेल्या, चौकशी सीबीआयकडे गेली, एनटीएने परीक्षा रद्द झाल्याचं सांगत, पुनर्परीक्षा होणार असल्याचं सांगितलं. पण सीबीआयच्या चौकशीत लिंक पोहोचली ती लातूरपर्यंत आणि आरसीसी क्लासेसचा संस्थापक, प्राध्यापक शिवराज मोटेगावकरला अटक झाली. सीबीआयकडून. चौकशीत एक एक धागा उलगडत गेला, सीबीआयने न्यायालयात सांगितलं, पेपर कोचिंग सेंटरमधून फुटला. कोचिंग सेंटर कुणाचं तर शिवराज मोटेगावकरचं. पण आता याच शिवराज मोटेगावरला CBI ने अटक केल्यावर या प्रकरणात ED चीही एंट्री होणार असल्याच्या चर्चा आहेत. सोबतच या पेपर फुटीत त्याच्या मुलाचाही संबंध असल्याच्या चर्चा आहेत. याच चर्चांबद्दलची डीटेल स्टोरी सांगणार हा व्हिडिओ. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/