Перейти к содержимому

श्रीपाद वल्लभ जयंती व गणेश चतुर्थीचा शुभ संयोग

Gurumauli गुरुमाऊली

0:00 / 0:00

श्रीपाद वल्लभ जयंती व गणेश चतुर्थीचा शुभ संयोग

2 935 просмотров · 1 день назад
Gurumauli गुरुमाऊली
92,9 тыс. подписчиков
2 935 просмотров · 1 день назад
श्रीपाद वल्लभ जयंती व गणेश चतुर्थीचा शुभ संयोग‪@gurumauli2021‬ चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेला श्री गणेश आणि भगवान दत्तात्रेयांचा आद्य अवतार असलेले श्रीपाद श्रीवल्लभ या दोघांचाही जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा. म्हणजेच गणेश चतुर्थी हीच श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांची जयंती होय.हिंदू पंचांगानुसार भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. याच अत्यंत पवित्र तिथीला कलियुगातील श्रीदत्तात्रेयांचा पहिला पूर्णावतार मानल्या जाणाऱ्या 'श्रीपाद श्रीवल्लभ' महाराजांचा जन्म झाला होता. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत' या ग्रंथानुसार ​श्रीपादांचे आजोबा श्री बापनाचार्य आणि इतर विद्वानांनी अनवल्ली येथे एक महायज्ञ केला होता. त्यावेळी साक्षात गणपतीने दर्शन दिले. आणि म्हणाले "मी सुमती महाराणीच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ रूपात जन्म घेईन,"मित्रांनो गणपती हा 'विघ्नहर्ता' आणि 'सर्व विद्येचा अधिष्ठाता' आहे. दत्तात्रेय हे गुरुतत्त्व आहेत. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी दत्तात्रेयांचा अवतार होणे म्हणजे विघ्ननाशक गणेशशक्ती आणि ज्ञान देणाऱ्या गुरुशक्तीचा सुंदर संगम मानला जातो. उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीनही शक्ती सामर्थ्याच्या पलिकडे असलेले विशिष्ट चतुर्थतत्व ज्यांना ज्ञात आहे असे''परमात्मा' म्हणून या दोघांचा उल्लेख केला जातो. गणपती अथर्वशीर्षामध्ये सत्व, रज आणि तम या तीन गुणांपलीकडचा, स्थूल सूक्ष्म आणि आनंद या तीन देहांपलीकडचा आणि भूत, वर्तमान आणि भविष्य या तीनही काळांच्या पलीकडचा असे श्री गणेशाचे वर्णन केले आहे. श्रीपाद श्रीवल्लभ ही श्रीगणेश स्वरूपच असल्याने त्यांनाही हे वर्णन चपखल लागू पडते. म्हणून या दिवशी एका बाजूला घराघरांत श्री गणेशाची स्थापना करून बाप्पाची पूजा केली जाते, तर दुसऱ्या बाजूला दत्त संप्रदायात श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्मोत्सव आणि नामस्मरण केले जाते. आपल्यातील गणपती तत्त्वास योगमार्गाने दर्शविण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी आपला अवतार गणेशचतुथीर्च्या मंगल दिनी या भूमीवर घेतला. भगवान श्री दत्तात्रेय जगदोद्धारासाठी इ. स. १३२० मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर क्षेत्री अप्पल राज शर्मा आणि सुमती या पुण्य दाम्पत्याच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ नावाने प्रकट झाले.पिठापुरम येथील देखण्या मंदिरातील श्रीपाद श्रीवल्लभांच्या मूर्तीच्या पवित्र दर्शनाने भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटते. #ganeshutsav #sheepadvallabhjayanti #ganpatibappamorya #pithapur #spiritualvideo #भक्तीमार्ग #dattaguru #gurudevdatta #shreeswamisamarth #dattatreya #dattabhakti #bhakti #dharmik #devotional #marathi #marathivlog #marathiviralvideo #viral #trending #sayali