Imran Khan Notice: OCI Card धारक इम्रान खानला Mumbai Police यांचे देश सोडण्याचे आदेश, कारणं काय ?
BolBhidu
0:00 / 0:00
Imran Khan Notice: OCI Card धारक इम्रान खानला Mumbai Police यांचे देश सोडण्याचे आदेश, कारणं काय ?
46 077 просмотров · 1 день назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
46 077 просмотров · 1 день назад
#BolBhidu #ImranKhan #ImranKhanControversy
१० ऑक्टोबरला मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या आंदोलनावेळी पोलीस आंदोलकांना ताब्यात घेत होते. पण त्यावेळी एका आंदोलकाने लोकांचं लक्ष वेधून घेतलं. पोलीस त्या आंदोलकाला व्हॅनमध्ये कोंबत असतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्याचे पोलीस व्हॅनमधले काही फोटो सुद्धा समोर आले. तो आंदोलक होता, अभिनेता इम्रान खान. ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत झालेल्या आंदोलनात इम्रान खानने हजेरी लावून आपला पाठींबा दर्शवला. पण या कारवाईनंतर इम्रानबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली. इम्रान खान हा भारताचा नागरिकच नसल्याचा दावा करण्यात आला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी इम्रान खानला अटक करण्याची आणि त्याला देशाबाहेर हाकलून द्यायची मागणी केली होती. याचबाबत आता इम्रान खानवर मोठी कारवाई झाली आहे. मुंबई पोलिसांनी इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडून जाण्याची नोटीस बजावली आहे. तर या नोटीसविरोधात इम्रान खान उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं सांगितलं जातंय. पण अमेरिकन नागरिक असलेल्या इम्रानने आंदोलनात सहभाग घेतला म्हणून त्याला भारत सोडायला सांगण्यात आलं का, त्याने कोणत्या नियमांचं उल्लंघन केलं आणि परदेशी नागरिकांसाठी आंदोलनाचे नियम नक्की काय सांगतात, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/