Dubai Tel Aviv Plane Case: प्लेन क्रॅश करण्याचा प्रयत्न, Pilots मध्ये हाणामारी, विमानात काय घडलं?
BolBhidu
0:00 / 0:00
Dubai Tel Aviv Plane Case: प्लेन क्रॅश करण्याचा प्रयत्न, Pilots मध्ये हाणामारी, विमानात काय घडलं?
228 265 просмотров · 1 день назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
228 265 просмотров · 1 день назад
#BolBhidu #DubaiTelAvivPlaneCase #DubaiPlaneCase
दुबईहून इस्रायलच्या दिशेनं जाणारं एक प्रवासी विमान. हे विमान ३४ हजार फूट उंचीवर उड्डाण करत होतं. पण अचानक एक घटना घडली आणि विमान अवघ्या २ मिनिटांत थेट १७ हजार फुटांनी खाली कोसळलं. त्याच वेळी एअर ट्रॅफिक कंट्रोलला विमानाच्या ट्रान्सपॉन्डरवरून एक कोड मिळाला. तो कोड होता, 7 5 0 0. याचा अर्थ असा होतो की, विमानाचं हायजॅकिंग झालं आहे. हा कोड मिळताच इस्रायलच्या एअर फोर्सनं तातडीनं आपली फायटर जेट्स हवेत रवाना केले. इकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांची आपत्कालीन बैठक बोलावली. बातमी पसरली की, इस्रायलला जाणारं विमान दहशतवाद्यांनी हायजॅक केलंय. पण काही वेळानं दुसरी बातमी आली. विमानाच्या दोन पायलटमध्ये भीषण हाणामारी झाल्याची. या हाणामारीत एका पायलटनं दुसऱ्या पायलटवर चाकूनं वार केले. या घटनेचे जे व्हिडियो सोशल मीडियावरती व्हायरल झाले, ते धक्कादायक आहेत. महत्त्वाचं म्हणजे, या दोन पायलट पैकी एक पायलट भारतीय असल्याचं समोर आलं असून, त्यानं विमानातल्या लोकांचा जीव वाचवल्याचं म्हटलं जातंय. पण दुबईहून इस्रायलकडे जाणाऱ्या विमानात नक्की काय घडलं? दोन पायलटमध्ये हाणामारी का आणि कशी झाली? विमानातून हायजॅकिंगचा मेसेज का आला? यात भारतीय पायलटनं काय केलं? तब्बल ३४ हजार फुटांवर घडलेला सगळा थरार जाणून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/