Vamandada Kardak | 'ही फियाट गाडी...' नगरच्या 'या' नेत्यामुळं हे गाणं ऐकायला मिळालंय
Ahilyanagarlive24
0:00 / 0:00
Vamandada Kardak | 'ही फियाट गाडी...' नगरच्या 'या' नेत्यामुळं हे गाणं ऐकायला मिळालंय
23 175 просмотров · 2 нед. назад
Ahilyanagarlive24
116 тыс. подписчиков
23 175 просмотров · 2 нед. назад
मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर 'ही फियाट गाडी माझी म्हणू का?' हे गाणं प्रचंड गाजतंय. आता हे गाणं, आत्ताचं नाहीए. तर ते अगदी ५० वर्षांपूर्वीचं आहे. या गाण्याला दोन महान दिग्गजांचा इतिहास लाभलाय. पहिला संबंध येतो, तो सोलापूरच्या वालचंद हिराचंद ग्रुपचा. याच ग्रुपने इटलीच्या क्रायस्लर समुहाशी भागिदारी केली. आणि भारतातील पहिली स्वदेशी बनवलेली फियाट कार भारतात तयार केली. आणि दुसरा संबंध आहे, थेट या गाण्याच्या जन्मदात्याचा... तो म्हणजे वामनदादा कर्डक यांचा. वामनदादा हे नगरच्या सीमारेषेजवळ असणाऱ्या सिन्नर तालुक्यातील देशवंडीचे. एका गरीब कुटुंबात जन्मलेले वामनदादा, पुढे पोटापाण्याकरीता मुंबईला गेले. वयाच्या २१-२२ व्या वर्षी लिहायला-वाचायला शिकले. आणि प्रसिद्ध शाहीर, गीतकार झाले. वामनदादांनी हजारो गाणी लिहिली. त्यातलेच 'ही फियाट गाडी माझी म्हणू का?' हे गाणं १९६० -७० च्या शतकात खूप गाजलं. पण मित्रांनो, याच वामनदादांचा आपल्या नगरशी असा काही ऋणानुबंध आहे, जो त्यांना जिवदान देऊन गेलाय. होय, नगरच्या एका महान नेत्यानं, वामनदादांना टीबी सारख्या जिवघेण्या आजारातून वाचवलं. वामनदादांच्या आजारपणातला सगळा खर्च या नगरी नेत्यानं उचलला. कदाचित या नेत्यानं वामनदादांना मदतीचा हात दिला नसता, तर कदाचित हे गाणंही आपल्याला ऐकायला मिळालं नसतं... त्या नेत्याचं नाव आहे, दादासाहेब रुपवते. अकोल्याचे रिपब्लिकन नेते दादासाहेब रुपवते आणि वामनदादा कर्डक यांच्यातील याच एका अनोख्या, भावनिक आणि ऐतिहासिक मैत्रीची गोष्ट आपण आजच्या व्हिडीओत पाहणार आहोत...
गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर
बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : ahilyanagarlive24@gmail.com
अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com
#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #