Bhendichi Bhaji | Okra recipe | सोपी आणि जुन्या पद्धतीने बनवलेली खमंग भेंडीची भाजी | Homemade Style
Gharcha Swaad
0:00 / 0:00
Bhendichi Bhaji | Okra recipe | सोपी आणि जुन्या पद्धतीने बनवलेली खमंग भेंडीची भाजी | Homemade Style
224 938 просмотров · 8 лет назад
Gharcha Swaad
1,27 млн подписчиков
224 938 просмотров · 8 лет назад
Bhendichi Bhaji | Okra recipe | सोपी आणि जुन्या पद्धतीने बनवलेली खमंग भेंडीची भाजी | Homemade Style | Bhindi ki sabzi
साहित्य - ३०० ग्रॅम भेंडी, ४ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, ७/८ कडीपत्त्याची पाने, ३ कांदे बारीक चिरलेले, ½ tbl spn राई, ½ tbl spn जिरे, १ tea spn हळद, २ ½ tbl spn घरगुती लाल मसाला, ½ tea spn हिंग, १ tbl spn धणे पावडर, ½ tbl spn घरगुती गरम मसाला, २½ tbl spn ठेचलेलं आलं लसूण, ३ tbl spn भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, ४ tbl spn ओल्या नारळाचा खीस, २ टोमॅटो मध्यम काप केलेले, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ६ tbl spn तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती - सर्व प्रथम भेंडी चिरून त्यांना तेलात सोनेरी रंगापर्यंत परतून घ्या. भेंडी परतून झाल्यानंतर त्यांना एका प्लेट मध्ये काढून घ्या. आता त्याच कढईत आणि त्याच तेलात राई, जिरे, हिंग, बारीक चिरलेले कांदे, मिरच्या, कडीपत्त्याची पाने घालून कांदा तांबूस होईपर्यंत परतून घ्यावा. फोडणी छान परतून झाल्यानंतर त्यात ठेचलेले आले लसूण घालावे आणि ते हि त्यात लालसर रंगापर्यंत परतून घ्यावे. परतून झाल्यानंतर त्यात हळद, घरगुती लाल मसाला, धणे पावडर, घरगुती गरम मसाला आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण २/३ मी. छान परतून घ्यावे. परतून झाल्यानंतर त्यात टोमॅटोचे काप घालावे आणि ते हि ३ मिनिटे मसाल्यात थोडे गळे पर्यंत परतावे. गॅसची आच मध्यम ठेवा. टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यात अर्धा ग्लासभर साधे पाणी घाला. मिश्रण एकजीव करून त्याला ५ मिनिटे चांगले शिजवून घ्या. ५ मिनिटानंतर त्यात ओल्या नारळाचा खीस आणि शेंगदाण्याचा कूट घाला सोबत चवीनुसार मीठ घाला आणि संपूर्ण मिश्रण २ मिनिटे चांगले परतून घ्या. आता यात फ्राय केलेली भेंडी घाला आणि मसाल्यात चांगली एकजीव करून पुन्हा २ मिनिटे परतून घ्या. तयार भेंडीची भाजीवर ओल्या नारळाचा खीस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर शिंपडून गरमागरम सर्व्ह करा. धन्यवाद !