Перейти к содержимому

Kobichi Bhaji | टिफिनसाठी खास झटपट डाळ कोबीची भाजी | Kobichi Bhaji Recipe In Marathi

Gharcha Swaad

0:00 / 0:00

Kobichi Bhaji | टिफिनसाठी खास झटपट डाळ कोबीची भाजी | Kobichi Bhaji Recipe In Marathi

128 888 просмотров · 8 л. назад
Gharcha Swaad
1,27 млн подписчиков
128 888 просмотров · 8 л. назад
Easy & Simple Homemade Tiffin Recipe By Gharcha Swaad #KobichiBhajiInMarathi #recipefortiffine #maharashtrianrecipe साहित्य - ५०० ग्रॅम कोबी, १०० ग्रॅम २ तास भिजवलेली चण्याची डाळ, ५ tbl spn तेल, ½ tea spn राई, ½ tea spn जीरे, ½ tea spn हिंग, ८/९ कडीपत्त्याची पाने, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, २ सुक्या लाल मिरच्या, २ कांदे बारीक चिरलेले, २ सुक्या मिरच्या, ½" आले, मूठभर कोथिंबीर, ३ हिरव्या मिरच्या, ½ कप भाजलेले सुके खोबरे, ३ tbl spn ओल्या नारळाचा खीस आणि चवीनुसार मीठ. कृती - कोबीची भाजी पात्तळ चिरून चांगला धुवून घ्या. एका कढईत तेल गरम करून त्यात राई, जीरे, हिंग, कडीपत्त्याची पाने घालून हले परतून घ्या. आता यात बारीक चिरलेल्या मिरच्या, कांदा आणि सुक्या मिरच्या घालून कांदा लालसर किंवा मउ होईपर्यंत परतून घ्या. कांदा मऊ झाल्यानंतर त्यात हळद आणि चिमूटभर मीठ घालून चांगले परतावे. ( चिमूटभर मीठ घातल्याने कोबी लवकर शिजते. ) परतून झाल्यानंतर त्यात चिरलेले कोबी आणि चणाडाळ घालून चांगले मिक्स करून घ्यावे. मिक्स करून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून झाकणावर १ वाटी पाणी घाला आणि ५ मिनिटे वाफ काढावी. मिक्सरच्या भांड्यात भाजलेले सुके खोबरे, ओल्या नारळाचा खीस, हिरव्या मिरच्या आणि मूठभर कोथिंबीर घालून वाटण तयार करून घ्या. ५ मिनिटानंतर झाकण उघडून भाजी परतून घ्यावी. भाजी परतून झाल्यानंतर यात तयार वाटण घाला आणि एकजीव करून घ्या. भाजी एकजीव झाल्यानंतर पुन्हा वर झाकण ठेवून १० मिनिटे वाफ काढा. ( १० मिनिटे वाफ काढताना मध्ये मध्ये ५-५ मिनिटांनी परतून घ्यावी. ) ५ मिनिटांनी झाकण उघडून त्यात चवीनुसार मीठ घाला आणि पुन्हा भाजी चांगली एकजीव करावी. आता शेवटची ५ मिनिटे वर झाकण ठेवून वाफ काढावी. ५ मिनिटांनी गॅस बंद करावा आणि डब्ब्यात चपाती सोबत वाढावी. धन्यवाद ! If you liked the video, Please Like & Share. ................................................................................................................. Follow Us On Instagram 👉   / gharcha_swaad   Follow Us On Facebook 👉   / gharcha.swaad   For Business Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com