Перейти к содержимому

Budhwar Peth Combing Operation साठी नाकाबंदी, मात्र लातूरचा तरुण का सापडला? | Story Dot Com

Story Dot Com

0:00 / 0:00

Budhwar Peth Combing Operation साठी नाकाबंदी, मात्र लातूरचा तरुण का सापडला? | Story Dot Com

97 463 просмотра · 8 месяцев назад
Story Dot Com
517 тыс. подписчиков
97 463 просмотра · 8 месяцев назад
#punenews #pune #budhwarpeth #storydotcom बुधवार पेठेत जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करायला लावला जात असल्याची तक्रार घेऊन एक तरुणी पोलिसांकडे आली, मात्र महिला हवालदाराने तिला मदत करण्याऐवजी पुन्हा बुधवार पेठेत तिला नेलं आणि दलालाच्या हवाली केलं. या बदल्यात महिला हवालदाराला मोबदला मिळाला खरा, पण हे मॅटर समोर आलं आणि तिच्यावर निलंबनाची कारवाई झाली. पण ही कारवाई झालेली असली तरी पुणे पोलिसांची अब्रू वेशीवर टांगली गेली होती. हे प्रकरण पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यापर्यंत पोहोचलं आणि बुधवार पेठेत कारवाईचे आदेश निघाले. गेल्या काही दिवसात बुधवार पेठेतून बांगलादेशी महिला सापडण्याचं प्रमाण वाढलंय आणि त्यात पुणे पोलिसांचेच कर्मचारी मदत करत असल्याचं समोर आल्यानंतर मात्र पोलिसांना आता आम्ही काही तरी करतोय हे दाखवणं गरजेचं होतं. अखेर पोलिसांनी बुधवार पेठेत मध्यरात्रीच्या वेळी रेड टाकली आणि ४१ इमारतींमध्ये घुसून सगळं सामान अस्ताव्यस्त केलं.. या कारवाईत साडे चारशेपेक्षा जास्त महिलांची चौकशी केली जात असताना तीनशेच्या आसपास पुरुषांचीही चौकशी झाली आणि यात एक लातूरचा पुरुषही सापडलाय, ज्याला पोलिसांनी अटक केली. पुणे पोलिसांनी कारवाई दाखवली असली तरी यातून नेमकं काय सापडलं, ज्या बांगलादेशी महिलांची चर्चा बुधवार पेठेत होतेय त्या बांगलादेशी महिला इथे कशा येतात आणि पुणे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह का उपस्थित होतायत तेच मी या व्हिडीओत सांगणार आहे. Join this channel to get access to perks:    / @storydotcomofficial   Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे. Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you. आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा - Facebook -   / officialstorydotcom   Instagram -   / officialstorydotcom   X - https://x.com/storydotcomnews Threads - https://www.threads.net/@officialstor...