Inflation Rate: कांद्याचे भाव दुपटीपेक्षा जास्त, धान्यांच्या किंमतीत वाढ, महागाईची नेमकी कारणं काय ?
BolBhidu
0:00 / 0:00
Inflation Rate: कांद्याचे भाव दुपटीपेक्षा जास्त, धान्यांच्या किंमतीत वाढ, महागाईची नेमकी कारणं काय ?
147 631 просмотр · 10 часов назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
147 631 просмотр · 10 часов назад
#BolBhidu #InflationRate #India
२ हजार रुपयांच्या पुढच्या युपीआय व्यवहारांवर चार्जेस लावण्याचा निर्णय १५ ऑक्टोबरपासून लागू होणार होता, पण ऐन सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांची आणि व्यापाऱ्यांची अडचण नको म्हणून हा निर्णय पुढे ढकलण्यात आला. या निर्णयामुळे दिलासा मिळाला असला, तरी दुसऱ्या बाजूला महागाईमुळे सामान्य नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात ४.८२ टक्के असलेला महागाईचा दर, सप्टेंबरमध्ये थेट ५.५४ टक्क्यांवर गेलाय. खाण्यापिण्याच्या वस्तूंची महागाई तर तब्बल ७.७४ टक्क्यांवर पोहोचलीये. ग्रामीण भागात हीच महागाई ८ टक्के ओलांडून गेलीये. कांदा गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट महाग झालाय, डाळींचे भाव आवाक्याबाहेर गेलेत, तर डॉलरच्या तुलनेत रुपया सर्वोच्च घसरणीचा सामना करतोय. रुपया घसरल्यामुळे तेल महाग झालं, तेल महागल्यामुळे मालवाहतूक महाग झालं आणि परिणामी रोजच्या वापरातल्या गोष्टी महागल्या. आता महागाई रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं व्याजाचे दर वाढवले, रुपया सावरण्यासाठी १३ वर्षांनंतर स्पेशल विंडोसारखा महत्वाचा निर्णय घेतला. तरीही नोव्हेंबर २०२६ पर्यंत महागाईचा दर ६.८ टक्क्यांवर जाण्याचा धोका व्यक्त केला जातोय. पण महागाई रोखण्यात यश का येत नाहीये? रुपया का घसरत चाललाय? समजून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/