हॉटेल सुरू करण्यासाठी किती Investment लागते? | Hotel Business Complete Guide ft. AD Brothers
3S TALK
0:00 / 0:00
हॉटेल सुरू करण्यासाठी किती Investment लागते? | Hotel Business Complete Guide ft. AD Brothers
957 просмотров · 2 месяца назад
3S TALK
50,7 тыс. подписчиков
957 просмотров · 2 месяца назад
#HotelBusiness #HotelInvestment #RestaurantBusiness #BusinessInvestment #HotelBusinessIdeas #3STalk
आजकाल आपल्याकडं दोन व्यवसायाचं फॅड आलंय. पहिला हातात मोबाईल आला की प्रत्येकाला इन्फ्लुएन्सर बनायचं असतं. आणि दुसरा फॉलोअर्स वाढले की एखादं हॉटेल टाकायचं असतं. भारतातल्या दर चौथ्या माणसाचं स्वप्नं असेल नोकरी सोडून एकदा तरी आयुष्यात हॉटेल काढायचंय ! लोकांना वाटत माणूस जगतोय तोपर्यंत खाणं बंद करणार नाही आणि हॉटेल रेस्टोरंट बिजनेस कधी बुडणार नाही. मात्र आज हॉटेलमध्ये जाणारेही हुशार झालेत. एकवेळ देवावर कमी विश्वास ठेवतील पण गुगल रिव्हियूज आणि रीलमधला फीडबॅक नक्की विचारात घेतील.
तुमच्या हॉटेलच एक पॉझिटिव्ह रील तुम्हाला शून्यातून उभं करेल. पण तेच निगेटिव्ह रील असेल तर गाशाही गुंडाळावा लागतो. मुद्दा असाय की हॉटेल किंवा रेस्टोरंट बिजनेस म्हणजे एखादा रिकामा गाळा, शेफ, चांगलं जेवण आणि ग्राहक एवढंच नाही. जग बदलतंय तसं व्यवसायाचं रूप बदलतंय, सप्लाय डिमांडच स्वरूप बदलतंय. त्यामुळे वर्षाला १०० हॉटेल्स ओपन होत असतील तर त्यातली ९० टक्के पहिल्या वर्षभर पण तग धरू शकत नाही. अशा परिस्थितीत हॉटेल बिजनेस कसा टिकवायचा हे माहित असणं गरजेचं आहे. तसंच कोणत्या प्रकारच्या हॉटेलमध्ये इन्व्हेस्ट करायचं तो ही गोंधळ असतोच. याच विषयात मागच्या १२-१३ वर्षांचा अनुभव असलेले अजिंक्य धांडोरे यांच्यासोबत या पॉडकास्टमध्ये सविस्तर चर्चा केली आहे.
00:00 - प्रोमो
1:00 - इंट्रो
2:15 - हॉटेल कन्सल्टंसी म्हणजे नेमकं काय?
3:52 - Consultant नेमका कोणत्या टप्प्यावर हवा?
5:13 - Consultantची Fee हा खर्च आहे की Investment?
6:50 - Consultancy घेतल्यामुळे हॉटेलचा किती खर्च वाचू शकतो?
11:40 - असा एखादा Project ज्यात तुम्ही लाखो रुपयांचं नुकसान वाचवलं?
15:25 - आज जर एखाद्याकडे ₹२ कोटी असतील, तर तुम्ही त्याला कोणता Hotel Model सुचवाल?
17:23 - चुकीच्या Kitchen Layout मुळे किती नुकसान होतं?
20:00 - Menu Engineering म्हणजे काय?
24:15 - Consultant नसल्यामुळे झालेली सर्वात मोठी चूक?
26:00 - तुम्ही हॉटेल सुरू करण्यापूर्वी कोणता Feasibility Report तयार करता?
27:14 - Location Final करण्याआधी काय तपासलं पाहिजे?
29:33 - एका हॉटेलचा Profit वाढवण्यासाठी पहिल्या ३० दिवसांत काय करता?
32:12 - Staff Training नफ्यावर कसा परिणाम करते?
35:00 - Inventory Control कशी करायची?
36:16 - Food Cost किती असावी?
38:57 - Consultant घेतलेल्या आणि न घेतलेल्या Project मध्ये काय फरक दिसतो?
40:42 - हॉटेल व्यवसाय कोणी सुरु करावा?
45:58 - हॉटेल, रेस्टोरंट, कॅफे या तीन वेगळ्या गोष्टी आहेत, जर एखाद्यालाच इन्व्हेस्ट करायचं आहे, तर त्याने कोणत्या गोष्टीत इन्व्हेस्ट करायला पाहिजे?
47:00 - रूम प्रॉपर्टीमध्ये कोणते घटक विचारात घेतले पाहिजेत?
50:30 - हॉटेल्सनी ऑनलाईन बुकिंग कसं सांभाळाव्या?
54:12 - काही कस्टमर त्रासदायक असतात, त्यांना कसे हॅन्डल केले पाहिजे ?
56:36 - हॉटेल मालकांनी कायदेशीर पेचात अडकू नये म्हणूनही कन्सल्टन्सी मदत करते का?
57:50 - भविष्यात कोणती हॉटेल्स जास्त चालतील?
59:00 - शेवट
Facebook : / 3stalk.co
Instagram : / 3stalk.co