Перейти к содержимому

कळीचे लाडू | दिवाळी स्पेशल फराळ | Kali che ladu

Swad Aani Godva

0:00 / 0:00

कळीचे लाडू | दिवाळी स्पेशल फराळ | Kali che ladu

585 просмотров · 13 дн. назад
Swad Aani Godva
75 подписчиков
585 просмотров · 13 дн. назад
साहित्य बेसन - अर्धा किलो साखर - अर्धा किलो तूप - 2 चमचे काजू - बारीक चिरलेले( आवश्यकतेनुसार) बदाम -बारीक चिरलेले( आवश्यकतेनुसार) मणूके -( आवश्यकतेनुसार) वेलची पावडर -( आवश्यकतेनुसार) कृती - १. सर्वप्रथम अर्धा किलो बेसन परातीत घेऊन त्यात चिमूटभर मीठ घाला. थोडे थोडे पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या. २. पिठाचे मोठे गोळे करून ते साच्यामध्ये भरा . ३. कढईमध्ये तेल गरम करून मध्यम आचेवर शेव पाडून घ्या.नंतर शेव तळून घ्या. शेव जास्त कडक न करता मऊसर तळा. ४. तळलेली शेव थोडी थंड झाल्यावर हाताने बारीक चुरून घ्या. ५. एका कढईमध्ये एक ग्लास पाणी गरम करा. त्याला उकळी आल्यावर अर्धा किलो साखर घाला आणि एकतारी पाक तयार करून घ्या. ६. पाक तयार झाल्यावर गॅस बंद करा. ७. बारीक चुरलेल्या शेवेमध्ये बारीक केलेले काजू, बदाम, मनुके आणि वेलची पावडर घाला. ८. त्यामध्ये तयार केलेला पाक आणि थोडे तूप घालून सर्व मिश्रण छान एकजीव करा. ९. मिश्रण गरम असतानाच हाताला थोडे तूप लावून लाडू वळून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर लाडू वळायला कठीण जाऊ शकते. १०. अशा प्रकारे मऊ कळीचे लाडू तयार आहेत! 💡 महत्त्वाची टीप अर्धा किलो बेसनासाठी अर्धा किलो साखर घ्या. एक किलो बेसन घेतल्यास एक किलो साखर घ्या. #कळीचेलाडू#लाडूरेसिपी#दिवाळीस्पेशलरेसिपी#बेसनलाडू#दिवाळीफराळ#TraditionalRecipe#घरगुतीरेसिपी# स्वाद आणि गोडवा