Перейти к содержимому

आज नवरात्रीचा पहिला दिवस, म्हणजेच घटस्थापना.🌺🙏पूजा झाल्यानंतर नाश्त्यासाठी डोसे आणि चटणी बनवली.😋

Kanchan Karne

0:00 / 0:00

आज नवरात्रीचा पहिला दिवस, म्हणजेच घटस्थापना.🌺🙏पूजा झाल्यानंतर नाश्त्यासाठी डोसे आणि चटणी बनवली.😋

107 просмотров · 13 дн. назад
Kanchan Karne
340 подписчиков
107 просмотров · 13 дн. назад
आज नवरात्रीचा पहिला दिवस, म्हणजेच घटस्थापना. 🌺🙏 सकाळी उठल्यावर खूपच फ्रेश आणि प्रसन्न वाटत होतं. नवरात्रीची सुरुवात असल्यामुळे घरातही एक वेगळंच भक्तिमय वातावरण जाणवत होतं. सगळ्यात आधी मंदिराची छान स्वच्छता केली आणि देवीची मनोभावे पूजा केली. मंदिर स्वच्छ केल्यानंतर तर अजूनच छान आणि प्रसन्न वाटायला लागलं. 🪔🌸 नवरात्रीचे हे नऊ दिवस देवीची भक्ती आणि श्रद्धेने पूजा करण्याचे असतात. आज घटस्थापना करून देवीकडे आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. पूजा झाल्यानंतर नाश्त्यासाठी गरमागरम डोसे आणि चटणी बनवली. 😋 अशा प्रसन्न आणि सुंदर वातावरणात आजच्या दिवसाची सुरुवात झाली. आई अंबेची कृपा आपल्या सगळ्यांवर सदैव राहो. 🙏🌺