तरुण पिढीला ग्रंथालयांकडे कसे आकर्षित करायचे? | Catch Up | Vinay Sahasrabuddhe | Marathi Podcast
Amol Parchure
0:00 / 0:00
तरुण पिढीला ग्रंथालयांकडे कसे आकर्षित करायचे? | Catch Up | Vinay Sahasrabuddhe | Marathi Podcast
2 120 просмотров · 1 месяц назад
Amol Parchure
29,2 тыс. подписчиков
2 120 просмотров · 1 месяц назад
'द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई' चे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी Catch Up च्या या भागात मनमोकळा संवाद साधला. २२० वर्षांहून अधिक इतिहास असलेल्या या ऐतिहासिक वास्तूतील दुर्मिळ ग्रंथ, नकाशे आणि नाण्यांविषयी त्यांनी अनेक रंजक किस्से सांगितले. ५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या 'Know Your Asiatic' या उपक्रमाबद्दल त्यांनी सांगितले आहे, मुंबईच्या टाऊन हॉलमधील ऐतिहासिक एशियाटिक सोसायटी ही केवळ एक लायब्ररी नसून ज्ञानाचा एक मोठा खजिना आहे.
या भागात डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी दॉंतेच्या 'डिवाइन कॉमेडी'च्या दुर्मिळ हस्तलिखिताची आणि शाहजहानकालीन 'शाहनामा' ग्रंथाची रंजक माहिती दिली आहे. "लोकांना प्रवचनापेक्षा प्रामाणिक संवादात रस असतो!" १८३० मध्ये बांधण्यात आलेल्या एशियाटिक सोसायटीच्या वास्तूमागे काय इतिहास आहे? डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी आपल्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देत एशियाटिकमधील त्यांच्या पहिल्या अनुभवाबद्दल सांगितले आहे. म्यानमारच्या नेत्या ऑंग सान सू ची यांनी लोकमान्य टिळकांच्या 'गीता रहस्य' ग्रंथाची मागणी का केली होती? दॉंतेच्या स्वलिखित 'डिवाइन कॉमेडी'च्या हस्तलिखितासाठी इटलीच्या सरकारने लाखो डॉलर्सची ऑफर दिली होती? ग्रंथालयातून पुस्तके चोरीला जाणे कसे रोखायचे? डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी एशियाटिक सोसायटीमध्ये लागू होणाऱ्या 'RFID' तंत्रज्ञानाची माहिती दिली आहे. डिजिटल युगात 'किंडल' आणि 'मोबाईल'वर वाचणाऱ्या वाचकांना मूळ ग्रंथांच्या स्पर्शाचा आनंद कसा द्यावा? एशियाटिक सोसायटीची वेबसाईट आणि 'ग्रंथ संजीवनी' पोर्टलद्वारे घरबसल्या १ लाखांहून अधिक दुर्मिळ पुस्तके कशी वाचता येतील? ऐतिहासिक ग्रंथालयांचे 'संवर्धनशास्त्र' (Preservation) नक्की कसे असते? बटर पेपर आणि वॉटरप्रूफिंगद्वारे जुनी पुस्तके कशी टिकवून ठेवली जातात? एशियाटिक सोसायटी ही केवळ उच्चभ्रू (Elite) लोकांसाठी आहे का? हा भ्रम दूर करत डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी सर्वसामान्यांना आमंत्रित केले आहे.
In this episode of Catch Up, Dr. Vinay Sahasrabuddhe, the newly elected President of The Asiatic Society of Mumbai, engaged in a candid conversation. He shared several fascinating anecdotes about the rare books, maps, and coins preserved in this historic structure that boasts a heritage of over 220 years. He spoke about the 'Know Your Asiatic' initiative starting on September 5th, emphasizing that the historic Asiatic Society located in Mumbai's Town Hall is not merely a library, but a vast treasure trove of knowledge. In this segment, Dr. Vinay Sahasrabuddhe shared interesting information about the rare manuscript of Dante's Divine Comedy and the Shah Jahan-era Shahnameh text.
"People are interested in honest conversations rather than lectures!" What is the history behind the Asiatic Society's building, which was constructed in 1830? Dr. Vinay Sahasrabuddhe fondly recalled his college memories and shared his very first experience at the Asiatic Society. Why did Myanmar's leader Aung San Suu Kyi request a copy of Lokmanya Tilak's book Gita Rahasya? Did the Italian government really offer hundreds of thousands of dollars for the handwritten manuscript of Dante's Divine Comedy? How can book theft from the library be prevented? Dr. Vinay Sahasrabuddhe provided information about the RFID technology being implemented at the Asiatic Society. In the digital age, how can readers who use Kindle and mobile phones be given the joy of touching original physical texts? How can over 100,000 rare books be read from the comfort of one's home through the Asiatic Society's website and the Granth Sanjeevani portal? What exactly is the 'preservation science' of historic libraries? How are old books preserved using butter paper and waterproofing? Is The Asiatic Society only meant for the elite? Dispelling this myth, Dr. Vinay Sahasrabuddhe warmly invited the general public to visit.
#VinaySahasrabuddhe #CatchUp #AmolParchure #MarathiPodcast