नाणेघाट. बाहेरच्याने आमच्या गावात धंदा करायचा नाही. महिलेला स्वताच्या जागेत व्यवसाय करायला बंदी.
JUNNAR TIMES
0:00 / 0:00
नाणेघाट. बाहेरच्याने आमच्या गावात धंदा करायचा नाही. महिलेला स्वताच्या जागेत व्यवसाय करायला बंदी.
338 834 просмотра · 5 лет назад
JUNNAR TIMES
646 тыс. подписчиков
338 834 просмотра · 5 лет назад
#Naneghat जुन्नर तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळ असलेल्या नाणेघाट येथे हजारो पर्यटक वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी येत असतात.
स्थानिक लोकांनी वनखात्याच्या पार्किंगमध्ये टेम्पो उभे करून त्यात वडापाव, कणीस असे पदार्थ विक्रीसाठी ठेवले आहे.
तसेच यमुनाबाई रावते या स्थानिक महिलेने त्यांच्या खाजगी जागेत धालेवाडी येथे राहणार्या गणेश सांगडे या व्यक्तीला भागीदार घेवुन पत्राशेड बांधून तिथे वडापाव आणि ईतर खाद्य पदार्थ विक्रीस ठेवले आहे. तसेच मोकळ्या जागेत खाजगी वाहनतळ तयार केले आहे.
यामुळे गणेश सांगडे यांचा जास्त धंदा व्हायचा. वन खात्याच्या वाहनतळावर आपल्या गाड्या लावुन वस्तु विकणार्या काही लोकांनी यमुना रावते यांना बाहेरच्या व्यक्तीला ईथे कशाला आणले हा मुद्दा काढून त्रास देणे सुरु केले.
आता हा दोघांचा वाद नाणेघाट पर्यंत मर्यादीत न राहता. तो गावात पोहचला आहे. आणि आता तर पोलीस स्टेशन पर्यंत पोहचला आहे.
पुढील अनर्थ टाळण्यासाठी संबंधित विभागांनी त्वरीत लक्ष देणे गरजेचे आहे.
जुन्नर टाईम्स, नाणेघाट