Перейти к содержимому

Pune Crime News: पुण्याच्या Dhayariत राहणाऱ्या Rakesh Nishar ने बायको Babitaला मुलासमोरचं का संपवलं?

BolBhidu

0:00 / 0:00

Pune Crime News: पुण्याच्या Dhayariत राहणाऱ्या Rakesh Nishar ने बायको Babitaला मुलासमोरचं का संपवलं?

207 969 просмотров · 1 г. назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
207 969 просмотров · 1 г. назад
#BolBhidu #PuneCrime #RakeshNishar पुण्यातला नांदेड सिटी परिसर. ६ मे 2025 ला या परिसरातून रात्री दीडच्या सुमारास एक माणूस स्कूटीवरुन निळ्या कापडात गुंडाळून काहीतरी घेवून चालला होता. त्या वस्तूचं वजन त्याला पेलवत नव्हतं. तो कसाबसा स्कूटीवरुन ती वस्तू घेऊन जात होता. स्वामीनारायण मंदिराजवळच्या भुमकर पुलाजवळ असलेल्या काही लोकांनी त्याला पाहिलं. तेव्हा त्या व्यक्तीबद्दल लोकांना संशय आला. त्यांनी लागलीच पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यावेळी पोलिसांचे बीट मार्शल गस्तीवर होते. बातमी मिळताच त्यांनी स्कूटीवरुन चाललेल्या माणसाला गाठलं. पोलिसांना बघून तो माणूस गाडी जोरात पळवायला लागला. एका पॉइंटला आपण पकडले जाणार या भीतीनं त्यानं गाडी रस्त्यावरच टाकली आणि शेजारी असलेल्या झाडांमध्ये पळाला. पोलिसांनी त्याच्या गाडीची पाहणी केली, तेव्हा त्यांना एक धक्कादायक गोष्ट दिसली. गाडीवरच्या त्या निळ्या कापडातून दोन पाय बाहेर आले होते. पोलिसांनी लगेच त्या माणसाचा पाठलाग सुरू केला आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्या व्यक्तीचं नाव राकेश निसार. कापडात गुंडाळलेला तो मृतदेह राकेशची पत्नी बबिताचा होता. राकेशनं बबिताची हत्या का केली, याबद्दल त्यानं दिलेल्या उत्तरामुळं पोलिसही चक्रावले. पण त्याचवेळी पोलिसांनी राकेश आणि बबिताच्या आठ वर्षांच्या मुलाची चौकशी केली. आणि या सगळ्या प्रकरणाचा छडा लागला. पुण्यातल्या धायरीत नक्की काय घडलं, राकेशनं बबिताची हत्या का केली आणि त्यांच्या मुलामुळं या प्रकरणाचं गूढ कसं उकललं, पाहुयात या व्हिडिओमधून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/