Перейти к содержимому

BRICS Currency: Dollar ऐवजी स्थानिक चलनांमध्ये व्यवहार? ब्रिक्सच्या स्वतंत्र चलनामुळे डॉलरला पर्याय?

BolBhidu

0:00 / 0:00

BRICS Currency: Dollar ऐवजी स्थानिक चलनांमध्ये व्यवहार? ब्रिक्सच्या स्वतंत्र चलनामुळे डॉलरला पर्याय?

433 474 просмотра · 2 дня назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
433 474 просмотра · 2 дня назад
#BolBhidu #BRICSCurrency #BRICS2026 ब्रिक्स. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या पाच देशांची संघटना. २०२४ साली ब्रिक्सचा मोठा विस्तार झाला आणि या संघटनेत इजिप्त, इथिओपिया, इराण, युएई आणि इंडोनेशिया या ५ नवीन देशांचा समावेश झाला. पूर्वी या समूहाकडे फक्त विकसनशील देशांचा एक मंच म्हणून पाहिलं जात होतं, पण आता परिस्थिती बदलल्याचं दिसून येतंय. आता ब्रिक्स हा पाश्चात्त्य देशांच्या वर्चस्वाला आव्हान देणारा सर्वात मोठा जागतिक गट म्हणून समोर येऊ लागला आहे. १८व्या ब्रिक्स परिषदेचं अध्यक्षपद भारताकडे आहे. दिल्लीत येत्या ११ आणि १२ सप्टेंबरला ही परिषद पार पडेल. जुलै २०२५ मध्ये १७वी ब्रिक्स परिषद ब्राझील येथे झाली होती. त्या परिषदेत चर्चेचा मुख्य मुद्दा होता, डॉलरवरची डिपेन्डन्सी कमी करण्याचा. त्यावेळी सर्व देशांचं या मुद्द्यावर एकमत झालं की, डॉलर या चलनावर असलेलं एककेंद्री धोरण बाजूला सारून प्रत्येक देशांनी पर्यायी चलनांचा आधार घेऊन व्यापार करायचा. यातूनच चर्चा सुरू झाली की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी ब्रिक्स देशांचं नवीन चलन जगासमोर आणलं आहे, ज्यामुळे आता अमेरिकन डॉलरची जगावरची मक्तेदारी संपणार आहे. मात्र, या चर्चांमध्ये किती तथ्य आहे? खरंच ब्रिक्स देशांचं अधिकृत चलन येणार आहे? यामध्ये भारताची भूमिका काय असणार आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे, यामुळे अमेरिकन डॉलरची मक्तेदारी संपेल का? सगळा विषय सविस्तर जाणून घेऊ या व्हिडीओच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/