आरे-वारे ची भन्नाट Road Trip | गणपतीपुळे | केशवसुतांचं मालगुंड | Konkan Travel Vlog
रस्ता आणि रस्सा
0:00 / 0:00
आरे-वारे ची भन्नाट Road Trip | गणपतीपुळे | केशवसुतांचं मालगुंड | Konkan Travel Vlog
435 просмотров · 4 нед. назад
रस्ता आणि रस्सा
3,56 тыс. подписчиков
435 просмотров · 4 нед. назад
कोकणातले काही रस्ते फक्त एका ठिकाणी घेऊन जात नाहीत... तो प्रवासच एक अनुभव असतो!
आणि आजचा प्रवास आहे अशाच एका भन्नाट रस्त्यावरून — आरे-वारे! 🚗🌊
रत्नागिरीहून उत्तरेकडे निघत, समुद्राच्या अगदी जवळून जाणारा हा सुंदर coastal road अनुभवत आपण पोहोचतो गणपतीपुळ्याला.
स्वच्छ समुद्रकिनारा, हिरवे डोंगर, अप्रतिम views आणि त्यातला हा drive...
काही दृश्यांचं वर्णन करायची गरजच नसते!
गणपतीपुळ्यात आपण भेट देतो प्रसिद्ध श्री गणपती मंदिराला. कोकणातील हे एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र असून, येथील स्वयंभू गणपती मंदिर आणि समुद्रकिनारा ही या ठिकाणाची खास ओळख आहे.
पण आपला दिवस इथे संपत नाही.
गणपतीपुळ्यापासून अगदी जवळच आपण पोहोचतो मालगुंडला — आधुनिक मराठी कवितेचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे कवी केशवसुत अर्थात कृष्णाजी केशव दामले यांचं जन्मगाव.
इथे आपण केशवसुत स्मारकाला सविस्तर भेट देतो — त्यांचं जन्मघर, त्यांच्या साहित्याशी संबंधित माहिती आणि मराठी कवितेच्या या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाची आठवण जपणारं हे ठिकाण जवळून पाहतो.
दिवस मोठा आहे...
प्रवास मोठा आहे...
पण रस्ता आणि रस्सा मध्ये दिवस संपतो तो एका चवीच्या वचनाने! 😋
व्हिडिओच्या शेवटी पुढच्या भागात बनवणार असलेल्या एका खास कोकणी पदार्थाची झलक नक्की पाहा.
🚗 या भागात
📍 Aare-Ware Beach Road
📍 Ganpatipule Ganpati Temple
📍 Malgund
📍 Keshavsut Memorial & Birthplace
रस्ता आणि रस्सा म्हणजे महाराष्ट्राच्या रस्त्यांवरून फिरताना तिथला इतिहास, माणसं, संस्कृती आणि चव अनुभवण्याचा आमचा प्रयत्न.
जर तुम्हाला महाराष्ट्र फिरायला आवडत असेल आणि स्थानिक पदार्थांची खरी गोष्ट जाणून घ्यायची असेल तर...
Subscribe करा आणि आमच्या सोबत या प्रवासात रहा..!!
#ganpatipule #aarewarebeach #Malgund #keshavsut #maharashtratourism #kokantourism
Chapters
00:00 - Intro
00:40 - Journey begins towards Ganpatipule
00:55 - Sakhartar Khadi
01:45 - Aare Beach View
03:00 - Aare Ware Beach Road
06:40 - Ware Beach view
07:00 - Beauty of Kokan
09:00 - Kajirbhati Beach view
10:30 - Ganpatipule
13:05 - Towards Malgund
13:35 - Zilla Parishad School
15:30 - Keshavsut Memorial
17:15 - Tutari Express
21:30 - Next Episode Preview