महाभारत योगरहस्य भाग २३ - योगिराज मनोहर हरकरे#yoga
Vaidik Vishwa
0:00 / 0:00
महाभारत योगरहस्य भाग २३ - योगिराज मनोहर हरकरे#yoga
84 просмотра · 13 дней назад
Vaidik Vishwa
3,74 тыс. подписчиков
84 просмотра · 13 дней назад
*महाभारत योग रहस्य - भाग२३
कौरव पांडव सेनेची अक्षौहिणी संख्या
पांडव म्हणजे सद्वृत्ती पक्ष आणि कौरव म्हणजे असद्वृत्ती पक्ष हे आपण पाहिलेच आहे. कौरव सेना अकरा अक्षौहिणी व पांडव सेना सात अक्षौहिणी सांगितली आहे, दोन्ही सैन्ये मिळून गीतेच्या अध्यायासारखे अठरा अक्षौहिणी सैन्य बनते. सर्व प्रदेशात सैन्याचे अनेक विभाग करून वेगवेगळ्या स्थानी युद्ध केले जाते, एकाच स्थानी नव्हे! काय अठरा अक्षौहिणी संख्या युद्धभूमीच्या तुकड्यावर एकत्र येऊ शकते? आणि या सर्व सेनेला एकत्र घेऊन कोणी युद्ध का करेल ? ‘अक्षौहिणी’ शब्दाचा व्यास आशय निराळा आहे.
अक्षौहिणी म्हणजे ‘अक्ष + अह + इनि’. आता अक्ष म्हणजे मूळ आधार (Axis) ज्यावर बैलगाडी अथवा घोडागाडीचे चाक फिरते. मानव पिंड ज्या मूळ आधारावर (मूलाधारावर) स्थित आहे त्याला व्यास अक्ष असे म्हणतात. ‘अह’ म्हणजे गतिमानता, जीवनयात्रा. ‘इनि’ म्हणजे अवस्था हे तीन उपशब्द मिळून अक्षौहिणी शब्द बनला आहे. ज्याचा व्यास आशय आहे साधक पिंडाची घटना, ज्याच्याद्वारे साधक आपले जीवन गतिमान करतो. पंचज्ञानेंद्रिये, मन आणि श्रेष्ठ बुद्धी मिळून पांडवांची धारणा सेना, पांडव सेनेची सात अक्षौहिणी संख्या दाखविली आहे. कौरवांची सेना अकरा अक्षौहिणी दाखविली आहे. पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये आणि एक असंस्कारित आडमुठे (दुः) मन मिळून कौरवांची अकरा अक्षौहिणी संख्या बनते. कौरव सेनेत श्रेष्ठ संतुलित बुद्धी नाही त्यामुळे संख्येने अधिक राहूनही कौरव वृत्तीयुद्धात पराभव होऊन नष्ट होतात. ही अठरा अक्षौहिणी सेना या आधी सांगितलेल्या धर्मक्षेत्रावर व कुरुक्षेत्रावर वृत्तीयुद्धासाठी एकवटते, जी प्रत्येक साधकाच्या क्षेत्रात सदासर्वदा संघर्ष करीत असते.
गीतेतील व्यक्तींची नावे
गीतेत साधारणतः धृतराष्ट्र, संजय, दुर्योधन, अर्जुन आणि श्रीकृष्ण यांची नावे आली असली तरी महाभारतात इतरत्र न आलेली अशी बरीच नावे गीतेने आपल्या वृत्तीयुद्धाकरिता वापरली आहेत. त्या नावांचा साधारण आशय साधारणतः ऐतिहासिक व्यक्तिनिहाय वाटत असला तरी अधिक खोल विचार केल्यास गीतेत वापरलेली सर्व नावे व्यासांनी आपल्या अध्यात्मिक वृत्तीयुद्धाकरिता आवश्यक अशीच वापरली आहेत. पहिल्या अध्यायात संजय धृतराष्ट्राला युद्धभूमिवरील वर्णन करण्यास सुरु करतो. वृत्तीयुद्ध सुरू होण्यापूर्वी प्रथम दुर्योधन गुरु द्रोणाचार्यांसमोर जाऊन त्यांचा आशिर्वाद मागताना पांडव पक्षातील आणि स्वकीय कौरव पक्षातील ज्या ज्या व्यक्तींची नावे सांगतो त्या नावात त्या त्या अवस्थावृत्तींना आवश्यक अशी वृत्तीनामेच वर्णन करतो. उदाहरणार्थ पांडव पक्षातील म्हणजे सद्वृत्ती पक्षातील युद्धहेतूने प्रेरित झालेल्या व्यक्तींची नावे संजय सांगतो. वरील सर्व नामयोजनेवरून वेद व्यासांची सूक्ष्मबुद्धी आणि योगशास्त्रातील सखोल व्यासंग आणि अनुभव लक्षात येऊ शकेल. शत-शत वृत्तीअवस्थांना नावे द्यावीत भगवान वेदव्यासांनीच ! इतरांना ती शब्दकिमया जमणे दुरापास्तच !
पांडव सेनेचे प्रमुख वीर
पांडव पक्षातील वीरांची जंत्री अशी द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न, युयुधान, सात्यकी, विराट, द्रुपद, धृष्टकेतु, चेकितान, बलवान काशिराज, पुरूजित, कुंतिभोज, नरपुंगव शैब्य, युधामन्यू, बलवान उत्तमौज, सुभद्रापुत्र अभिमन्यू, आणि द्रौपदीचे पाच पुत्र.
धृष्टद्युम्न
धृष्टद्युम्न याला द्रुपद राजाचा पुत्र दाखविला असून त्यानेच पांडव सेनेची युद्धाच्या पहिल्या दिवशी व्यूहरचना केली होती असे लिहिले आहे. द्रौपदी आणि धृष्टद्युम्न सख्खे बहीण भाऊ होत. द्रुपद राजाने एक यज्ञ केला असता त्या यज्ञज्वालांमधून द्रुपदाला एक पुत्र प्राप्त झाला असे कथेत सांगितले आहे. कोणत्याच मानवाची अथवा साध्या जीवाची सुद्धा प्राप्ती यज्ञाच्या ज्वालेतून अथवा यज्ञातून होत नसते. यावरून यज्ञ म्हणजे वृत्ती तपस्या केल्यावर त्या तपस्येच्या तपनातून अथवा ज्वालांमधून प्राप्त होणारा पुरुषार्थ म्हणजे वेदव्यासांच्या दृष्टीने पुत्र धृष्टद्युम्न होय. यज्ञ म्हणजे अग्नी भडकवून त्यात काही कथित मंत्र पुटपुटून आहुती देणे नसून तपस्येद्वारे मन-बुद्धीला अधिक सूक्ष्मग्राही बनविणे होय. म्हणूनच गीतेत यज्ञाचे स्वरूप खालीलप्रमाणे सांगितले आहे.
ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नी ब्रह्मणा हुतम् । ब्रह्मैव तेन गंतव्यंब्रह्मकर्मसमाधिना ॥ श्लो. २४, अ.४ ॥
‘ब्रह्म हवीनेच ब्रह्माला अर्पण करायचे, अग्नीसुद्धा ब्रह्म असून त्यात आहुतीसुद्धा ब्रह्माच्याच द्यायच्या असतात. असल्या आहुती ब्रह्मालाच जात असून कर्म सुद्धा ब्रह्मच आहे’.
असल्या तपस्यापूत जीवनाला यज्ञ असे म्हणतात. खऱ्या यज्ञाची ही कल्पना आणि क्षमता नंतरच्या काळात नष्ट होऊन अग्नी प्रज्वलित करून त्यात इतर वस्तूंद्वारे आहुती देऊन ब्रह्मकर्म केल्याचा अविर्भाव आणला गेला. मूळ कल्पना जाऊन त्याऐवजी नाट्य आणि कर्मावडंबर उत्पन्न झाले. असल्या अवडंबराचाच उपनिषदांनी आणि बुद्धांनी विरोध केला होता. यज्ञ म्हणजे साधनेकरिता करायची तपस्या होय.
असल्या यज्ञातून द्रुपदाला धृष्टद्युम्नाची पुत्ररूपाने प्राप्ती झाली होती, द्रुपदाचा आशय आपण मागे पाहिला आहेच. द्रु-पद म्हणजे लवकर द्रुत गतीने उच्च पदी विराजमान होतो असा यशस्वी साधक होय. ‘द्रु+पद’ उपशब्द मिळून द्रुपद शब्द बनला आहे. या द्रुपदाचीच पुत्री द्रौपदी होय जी धृष्टद्युम्नाची बहीण दाखविली आहे. आता धृष्टद्युम्न कोण? ती व्यासांची कल्पना पहावी लागेल. ‘धृ’ धातूपासून ‘धृष्ट’ शब्द तयार झाला असून धृष्ट म्हणजे ज्याने इष्ट धारणा केली आहे अशी साधकावस्था होय. ‘द्युम्न’ शब्दात ‘द्यू’ शब्दच महत्त्वाचा आहे. ‘द्यु’ म्हणजे एक प्रकारचा लोक अथवा सृष्टीच्या उत्क्रांतीची अवस्था होय. मरणानंतर याच द्यू लोकाला भीष्म निघून गेले अशी कथा महाभारतात आहे.
क्रमशः
लेखक – योगिराज मनोहर हरकरे
संदर्भ ग्रंथ - श्रीमद्भगवत गीता - व्यास आशय
अधिक माहितीसाठी संपर्क-
९७०२९३७३५७