भाजपने तिकीट दिलं तरी घेणार नाही? नीलेश काब्राल नाराज; म्हणाले 'विचार करावा लागेल' | Goa Politics
Lokmat Goa
0:00 / 0:00
भाजपने तिकीट दिलं तरी घेणार नाही? नीलेश काब्राल नाराज; म्हणाले 'विचार करावा लागेल' | Goa Politics
3 987 просмотров · 7 часов назад
Lokmat Goa
1,12 тыс. подписчиков
3 987 просмотров · 7 часов назад
भाजपचे कुडचडेचे आमदार आणि माजी मंत्री नीलेश काब्राल यांनी पक्ष नेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तिकीट दिलं तरी ते स्वीकारायचं की नाही, याचा विचार करावा लागेल, असं काब्राल यांनी म्हटलं आहे.
मंत्रिपदाचा राजीनामा, काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना मिळालेली मंत्रिपदं, जुन्या निष्ठावंतांना मिळणारं स्थान आणि भाजपच्या बदललेल्या राजकीय संस्कृतीवर काब्राल यांनी भाष्य केलं.
'भाजप काँग्रेसयुक्त झाला आहे', अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली. मात्र, पक्ष सोडण्याची किंवा कोणत्याही पर्यायी पक्षात जाण्याची घोषणा त्यांनी केलेली नाही.
काब्राल यांच्या वक्तव्याचा नेमका राजकीय परिणाम काय होतो, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
#NileshCabral
#Goa #goanews #goapolitics #bjpgoa #goacongress