Manoj Jarange Patil यांचं उपोषण मागे, सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या, आरोप काय होतायत ?
BolBhidu
0:00 / 0:00
Manoj Jarange Patil यांचं उपोषण मागे, सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या, आरोप काय होतायत ?
145 112 просмотров · 1 день назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
145 112 просмотров · 1 день назад
#BolBhidu #ManojJarangePatil #DevendraFadnavis
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मंगळवारी १५ सप्टेंबरला मुंबईच्या दिशेने निघाले होते. १६ सप्टेंबरच्या मध्यरात्री ते बीडच्या पाटोद्यामध्ये पोहोचले तेव्हा त्यांची तब्येत प्रचंड खालावली होती, १६ तारखेच्या दुपारी ते बेशुद्ध पडल्याची आणि त्यांच्यावर त्याच अवस्थेत उपचार सुरु असल्याची बातमी आली. पण त्यानंतरही मनोज जरांगे पाटील यांनी आपण १७ तारखेला दुपारी एक वाजता पाटोद्यावरुन निघू आणि थेट मुंबईला जाऊ अशी घोषणा केली होती. अशातच १७ तारखेला सरकारचं शिष्टमंडळ बीडच्या पाटोद्यात दाखल झालं, त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या काही मागण्या मान्य करण्याची हमी दिली आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलं. पण सकाळी ६ वाजता पाटोद्यात नेमकं काय घडलं ? मनोज जरांगे पाटील यांच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या ? त्यांनी सरकारला ९० दिवसांचा अल्टिमेटम का दिला आहे ? आणि ओबीसी नेत्यांकडून मनोज जरांगे पाटील यांच्यावर काय टीका होत आहेत ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/