मुलांना स्वतःच्या आयुष्याची मालकी वाटावी म्हणून
Parent Academy
0:00 / 0:00
मुलांना स्वतःच्या आयुष्याची मालकी वाटावी म्हणून
10 617 просмотров · 1 месяц назад
Parent Academy
52 тыс. подписчиков
10 617 просмотров · 1 месяц назад
"मुलं कशाची काही जबाबदारीच घेत नाहीत. खाण्यापिण्यापासून ते शाळा अभ्यासापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये आमच्यावर उपकार केल्यासारखं वागतात. कोणतीही गोष्ट दहादा मागे लागल्याशिवाय केली जात नाही. आणि केलीच तर ती अगदी पाट्या टाकल्यासारखी केली जाते." अशा तक्रारी अनेक पालक अनेक वेळा करत असतात.
ह्यामागे नेमकं काय कारण असतं? मुलं स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी का घेत नाहीत. ती जबाबदारी त्यांनी घ्यावी आणि स्वतःच्या आयुष्याची मालकी त्यांना वाटावी म्हणून पालकांनी काय केले पाहिजे? ह्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांचा उहापोह करत आहेत, प्रसिद्ध बालमानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर भूषण शुक्ल.