Перейти к содержимому

Pune Kidnapping: Viral Audio Clip आणि Reels,पुण्यात 123 मुलींच्या अपहरणाचा दावा, पण नेमकं सत्य काय ?

BolBhidu

0:00 / 0:00

Pune Kidnapping: Viral Audio Clip आणि Reels,पुण्यात 123 मुलींच्या अपहरणाचा दावा, पण नेमकं सत्य काय ?

268 570 просмотров · 1 день назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
268 570 просмотров · 1 день назад
#BolBhidu #PuneGirlsKidnapping #PuneViralAudio पुण्यात २२ तासांत १२३ मुलींचं अपहरण झालंय. हे सगळं मुलीच करतायत. मुलीच ट्रॅप लावून मुलींचं अपहरण करतायत. हे मला पोलिसांनीच सांगितलं अशी एका महिलेची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्यासोबत झालेल्या गैरप्रकाराची तक्रार करण्यासाठी पोलिस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनीच मला ही माहिती मिळाल्याचा दावा संबंधित महिलेने या ऑडिओ क्लिपमध्ये केला. पुण्याच्या सिंहगड रोड परिसरात पिरेड्स आल्याचं सांगून एका मुलीने आपल्यासोबत गैरप्रकार केल्याचं महिलेने या क्लिपमध्ये सांगितलं. फॉरवर्डेड मेनी टाइम्स असलेल्या या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ उडाली. त्यावरुन अनेक तरुणींनी रील करुन पुण्यातल्या महिलांना अलर्ट करत सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं. या ऑडिओ क्लीप आणि व्हिडिओंमुळे वेगवेगळ्या अफवा सुद्धा पसरत असून महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पुण्यात महिला सुरक्षित नसल्याचे मेसेज सुद्धा फॉरवर्ड केले जात आहेत. पण या सगळ्याबद्दल आता पुणे पोलिसांकडूनच माहिती देण्यात आली आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ क्लिपमधल्या दाव्यांचा नेमकं तथ्य काय, पोलिसांनी त्याबद्दल काय सांगितलंय आणि या दाव्यांमध्ये खरंच तथ्य आहे की या फक्त अफवा आहेत, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/