मोबाईल देवा — आरती by Dr. Rajshri Sanjay Jadhav
Rangchata
0:00 / 0:00
मोबाईल देवा — आरती by Dr. Rajshri Sanjay Jadhav
537 просмотров · 5 дн. назад
Rangchata
118 подписчиков
537 просмотров · 5 дн. назад
📱 मोबाईल देवा — आरती
*मुखडा (कोरस)*
जयदेव जयदेव जय मोबाईल देवा!
तुझ्या सहवासात सर्वकाळ मिळतोय मेवा!
जयदेव जयदेव जय मोबाईल देवा!
जग सारे जोडणारा तूच आमचा ठेवा!
*कोरस (प्रत्येक कडव्यानंतर)*
मोबाईल देवा, मोबाईल देवा!
साऱ्या जगाचा तूच विसावा!
चार्जिंग देवा, नेटवर्क देवा!
जय जयकार मोबाईल देवा!
*१.*
काळीज तुझे चार्जिंग हवेसे फार,
लाईट नसताना चिंतेचाच भार!
चार्जर शोधताना उडतो थरार,
बॅटरी लो झाली की जीव होई बेजार!
*कोरस*
मोबाईल देवा, मोबाईल देवा!
साऱ्या जगाचा तूच विसावा!
चार्जिंग देवा, नेटवर्क देवा!
जय जयकार मोबाईल देवा!
*२.*
जीवात जीव येई चार्जिंग फुल्ल,
बिनधास्त वापर, समस्या गुल्ल!
नेटवर्क मिळता मन होते खुशाल,
डेटा संपताच होई बुरा हाल!
*३.*
व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाची हजेरी,
रोज नवी नवी हवीहवीशी खबर भारी!
लाईक आणि कमेंटचा रंग न्यारा,
स्क्रोल करता संपे दिवस सारा!
*४.*
फोटो, बातमी क्षणात फिरुनी नेते,
दूरच्या माणसांना जवळ आणते!
व्हिडिओ कॉलमधुनी भेटीचा आनंद,
तंत्रज्ञानाने खुलतो नात्यांचा छंद!
*कोरस*
मोबाईल देवा, मोबाईल देवा!
साऱ्या जगाचा तूच विसावा!
चार्जिंग देवा, नेटवर्क देवा!
जय जयकार मोबाईल देवा!
*५.*
गेमची गंमत लहानथोर घेई,
खेळता खेळता वेळ कुठे जाई!
कधी हसवितो, कधी राग आणतो,
अति वापराने अभ्यासही बिघडवितो!
*६.*
सावध नजरेने वापर करावा,
खोट्या बातम्यांना बळी न पडावा!
घाईत निर्णय घेऊ नये कधी,
विचार करूनच पुढे जावे सदा!
*७.*
डोईवर चढवून खाली पाडती,
व्ह्यूजच्या नादात स्वतःला विसरती!
फॉलोअर्सचा रुबाब भारी दिसतो,
खरा आनंद मात्र मनातच वसतो!
*८.*
आकर्षण तुझे पैशांत मोजावे किती,
नव्या मॉडेलची लागते ओढ किती!
महागड्या फोनचा मोठा थाट,
पण माणुसकीचाच असावा रुबाब!
*९.*
अनेक लोक याचा हेवा करतात,
दाखविण्यासाठी नवे फोन घेतात!
दिखाव्यापायी कर्ज न वाढवावे,
आपल्या ऐपतीतच सुख शोधावे!
*१०.*
योग्य की अयोग्य विचार करावा,
तनमनाचा सुदृढ मान राखावा!
डोळ्यांना विश्रांती, शरीराला व्यायाम,
मर्यादित वापर हाच खरा विराम!
*११.*
आन, बाण, शान ध्यानी असावे,
आहारी जाताना भानही असावे!
मोबाईल वापरावा ज्ञानासाठी,
वेळ द्यावा कुटुंब अन् जीवनासाठी!
*अंतिम कोरस (सर्वांनी एकत्र)*
मोबाईल देवा, मोबाईल देवा!
ज्ञानाचा प्रकाश तू, जगण्याचा ठेवा!
योग्य वापराचा मंत्र तू द्यावा,
सुखी जीवनाचा मार्ग दाखवावा!
जयदेव जयदेव जय मोबाईल देवा!
तुझ्या सहवासात सर्वकाळ मिळतोय मेवा!
जयदेव जयदेव जय मोबाईल देवा!
जग सारे जोडणारा तूच आमचा ठेवा!
*गजर!*
बोला मोबाईल देवा की — जय!
चार्जिंग देवा की — जय!
नेटवर्क देवा की — जय!
मर्यादित वापराचा — विजय असो! 🙏📱
#मोबाईलदेवा #मराठीआरती #MarathiAarti #MarathiSong #मराठीगाणी #MobileDeva #MarathiBhaktiGeet #RajashreeSanjayJadhav