Перейти к содержимому

Buldhana रस्त्याअभावी आदिवासी महिलेचा मृत्यू? चाळीसटापरीचं धक्कादायक वास्तव | BaiManus

BaiManus

0:00 / 0:00

Buldhana रस्त्याअभावी आदिवासी महिलेचा मृत्यू? चाळीसटापरीचं धक्कादायक वास्तव | BaiManus

386 просмотров · 2 недели назад
BaiManus
47,7 тыс. подписчиков
386 просмотров · 2 недели назад
#buldhana #buldhanaNews #chalisatapri चाळीसटापरी... बुलढाणा जिल्ह्यातला हा आदिवासी पाडा. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही या पाड्यापर्यंत धड रस्ता पोहोचलेला नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. आणि याच रस्त्याच्या प्रश्नाने आता एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सादुरी खरात... वय अवघं 25 वर्षं. सर्पदंश झाल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेणं गरजेचं होतं. मात्र, चाळीसटापरीपर्यंत योग्य रस्ता नसल्याने त्यांच्या नातेवाईकांना त्यांना झोळीच्या सहाय्याने नेण्याचा प्रयत्न करावा लागला. त्या रात्री नेमकं काय घडलं? सादुरी खरात यांच्या पतीने आणि नातेवाईकांनी काय सांगितलं? आणि वर्षानुवर्षांपासून रस्त्याचं आश्वासन मिळूनही परिस्थिती का बदललेली नाही? या रिपोर्टमध्ये जाणून घ्या: • चाळीसटापरीमध्ये रस्त्याची नेमकी समस्या काय आहे? • सर्पदंशानंतर सादुरी खरात यांना उपचारासाठी नेताना काय अडचणी आल्या? • नातेवाईकांना झोळीचा पर्याय का वापरावा लागला? • रस्त्याबाबत नागरिकांना यापूर्वी कोणती आश्वासनं मिळाली? • वर्षानुवर्षे समस्या कायम का आहे? • सादुरी यांच्या मृत्यूनंतर प्रशासन आता काय भूमिका घेणार? सादुरी खरात यांचा मृत्यू केवळ सर्पदंशामुळे झाला, असं म्हणून हा विषय संपवता येणार नाही. कारण सर्पदंशाच्या वेळी वेळेत आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. चाळीसटापरीसारख्या दुर्गम भागात रस्त्याअभावी उपचारापर्यंत पोहोचण्यास विलंब होत असेल, तर हा केवळ एका कुटुंबाचा प्रश्न राहत नाही. नेते येतात, आश्वासनं देतात, फोटो काढतात आणि निघून जातात... पण पाडा, रस्ता आणि नागरिकांच्या अडचणी मात्र तशाच राहतात, अशी स्थानिकांची भावना आहे. आता सवाल एकच — आणखी किती सादुरींचा जीव गेल्यावर चाळीसटापरीपर्यंत रस्ता पोहोचणार? तुमच्या परिसरातही आजपर्यंत रस्ता किंवा मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना संघर्ष करावा लागतोय का? तुमचा अनुभव Comment मध्ये सांगा. Produced by Baimanus Media Research Foundation अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : Website : www.baimanus.in Facebook :   / baimanus.in   Instagram :   / baimanus.in   Twitter :   / baimanusindia