Перейти к содержимому

नमो शेतकरी मिळणार, रेग्युलर कर्जदार, दुष्काळी मदत वाढीव दराने | किसान सभेला मुख्यमंत्र्यांच आश्वासन

Prabhudeva GR & sheti yojana

0:00 / 0:00

नमो शेतकरी मिळणार, रेग्युलर कर्जदार, दुष्काळी मदत वाढीव दराने | किसान सभेला मुख्यमंत्र्यांच आश्वासन

33 103 просмотра · 3 ч назад
Prabhudeva GR & sheti yojana
772 тыс. подписчиков
33 103 просмотра · 3 ч назад
नमो शेतकरी मिळणार, रेग्युलर कर्जदार, दुष्काळी मदत वाढीव दराने | किसान सभेला मुख्यमंत्र्यांच आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे अखिल भारतीय किसान सभेच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक पार पडली. सध्या राज्यात असलेल्या संघर्षमय दुष्काळी परिस्थितीमध्ये राज्य सरकार शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करत आहे. राज्य सरकारच्या मदतीतून हा दुष्काळाचा संघर्ष निश्चितच कमी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अडचणीत असलेल्या उपसा सिंचन योजनांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, या निर्णयाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ₹5000 ची अग्रिम मदत देण्यात येईल. या अग्रिमामुळे शेतकऱ्यांना ‘एनडीआरएफ’च्या निकषांपेक्षा अधिक मदत मिळणार आहे. दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करून चारा उपलब्ध करून देण्यास सरकारचे प्राधान्य आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते शेतकऱ्यांना देण्यात येतील. नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासन प्रोत्साहनपर ₹50,000 चे अनुदान देत आहे. या अनुदानात वाढ करण्याबाबत कर्जमाफीसाठी गठित मंत्रिगट चर्चा करेल आणि आर्थिक परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेण्यात येईल. नवीन पीक कर्ज देताना सिबिलची अट ठेवू नये, यासाठी रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून सर्व बँकांना पत्र देण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत ई-केवायसी पूर्ण केलेल्या महिलांना थकीत हप्ता तातडीने देण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नवीन लाभार्थी तसेच ई-केवायसी न झालेल्या आदिवासी भागातील महिलांबाबत सरकार सकारात्मक विचार करेल. पीक विम्यासाठी पूर्वी लागू असलेले ट्रिगर पुन्हा सुरू करण्याबाबत संबंधित विभागामार्फत तपासणी करून निर्णय घेण्यात येईल. बाळ हिरड्याची आदिवासी विकास महामंडळामार्फत होणारी खरेदी पूर्ववत करावी आणि या उत्पादनाचा किमान आधारभूत दरामध्ये समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ग्राम रोजगार सेवकांचे मानधन ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा न करता त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा करण्याबाबत विभागाने तपासून कार्यवाही करावी. केंद्र सरकारच्या नवीन कामगार कायद्यानुसार बांधकाम कामगारांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजनांचे स्वरूप निश्चित करावे. त्यांच्यासाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना सुरू करण्याबाबतही सरकार सकारात्मक आहे. वर्धा जिल्ह्यात कृषी पंपाच्या वीजजोडणीसाठी मागणीपत्र भरूनही जोडणी न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या प्रकरणांची तपासणी करून कार्यवाही करावी. सौरऊर्जेवर आधारित कृषी पंप कार्यान्वित केलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचीही सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन, मंत्री दत्तात्रय भरणे, वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. नमस्कार शेतकरी मित्रांनो! "Prabhudeva GR and Sheti Yojana" या आपल्या YouTube चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. आपल्या चॅनेलचा मुख्य उद्देश महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांची (Government Schemes) आणि नवीन शासन निर्णयांची (GR) माहिती अत्यंत सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा आहे. आमच्या चॅनेलवर तुम्हाला खालील विषयांवर नियमित अपडेट्स मिळतील: ✅ नवीन शासन निर्णय (Maharashtra Latest GR) ✅ शेती योजना (Agricultural Schemes & Subsidies) ✅ सातबारा आणि ८अ उतारे (7/12 & 8A Land Records) ✅ पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना अपडेट्स ✅ सिंचन, सौर पंप आणि कर्जमाफी योजना ✅ जमीन मोजणी आणि महसूल विभाग अपडेट्स शेतीविषयक सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला Subscribe करा आणि शेतकरी बांधवांना शेअर करा! Also 🌍Follow me WhatsApp - https://whatsapp.com/channel/0029Va9g... Website - https://grnshetiyojna.in/ Website - https://www.prabhudevalg.com/ Instagram - https://www.instagram.com/prabhakarsh... 👬Facebook -   / community   ▶️ Telegram group - https://t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo Telegram channel - https://t.me/pdgrshetiyojna ▶️ Youtube -    / prabhudevalg   , ▶️ Youtube -    / @aplemahitikendra   👬Facebook Page   / community   @Facebook Group -   / 2416394001930535   @Prabhu Deva #Prabhudeva , #gr_&_sheti_yojana, #PrabhuDevagr, #Prabhudeva_gr_&_sheti_yojana , support me for updates about mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana, NDKSP, Gharkul, solar or other govt gr updates TIME STAMPS 00:00 TO 01:00 01:01 TO 02:01 02:02 TO 03:00