Перейти к содержимому

मुंबईजवळ निसर्गाच्या कुशीतील Beach होम स्टे | Beach home stay in the lap of nature near Mumbai

Sunil D'Mello

0:00 / 0:00

मुंबईजवळ निसर्गाच्या कुशीतील Beach होम स्टे | Beach home stay in the lap of nature near Mumbai

13 959 просмотров · 4 месяца назад
Sunil D'Mello
149 тыс. подписчиков
13 959 просмотров · 4 месяца назад
मुंबईजवळ निसर्गाच्या कुशीतील Beach होम स्टे | Beach home stay in the lap of nature near Mumbai ॲलीनने दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवल्याचा आनंद साजरा करण्यासाठी आम्ही चिंचणी समुद्रकिनारी एका सुंदर होम स्टे मध्ये गेलो होतो. पश्चिम रेल्वेच्या डहाणूच्या दिशेने असलेल्या वानगाव स्थानकातून रिक्षाने अवघ्या १५-२० मिनिटांत या होम स्टेवर पोहोचता येतं. हे टुमदार होम स्टे समुद्रकिनाऱ्यापासून अवघ्या शंभर दीडशे मीटरवर आहे, त्यामुळे येथे नेहमी आल्हाददायक वारा वाहत असतो. समोर फेरफटका मारण्यासाठी सुंदर नारळीबाग देखील आहे. येथे अटॅच्ड बाथरूम असलेल्या स्वच्छ आणि प्रशस्त अशा पाच ए.सी. खोल्या आहेत. या होम स्टेची खासियत म्हणजे एका वेळेला ते फक्त एकाच ग्रुपची बुकिंग घेतात त्यामुळे तुम्हाला पूर्ण प्रायव्हसी मिळते. खोल्या मोठ्ठ्या असल्यामुळे जमीनीवर गाद्या टाकल्यास एकावेळेला तब्बल २५ ते ३० माणसं येथे राहू शकतात. सकाळी ११ वाजता चेक इन केल्यावर तुम्हाला दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा व नाश्ता, रात्रीचं जेवण तुमच्या मागणीनुसार वेज आणि नॉन वेज प्रकारात मिळतं. येथील जेवण अतिशय रुचकर आहे. जवळच्या मासळी बाजारातून मासे आणून दिल्यास काही दर आकारून तुम्हाला ते शिजवून देखील मिळतील. होम स्टेच्या प्रशस्त गच्चीवर कॅरम, पत्ते किंवा इतर बरेच खेळ तुम्ही खेळू शकता आणि संध्याकाळी येथील सुंदर समुद्रावर धमाल करायला जाऊ शकता, जिकडे मुलांसाठी बरेच खेळ उपलब्ध आहेत व तिकडेच चौपाटीवरील चमचमीत पदार्थांवर तावदेखील मारू शकता. शिवाय निसर्गप्रेमींना येथील एका अनोख्या झाडांचं बन विशेष आनंद देऊन जाईल. कुटुंबाच्या गेट-टुगेदरसाठी, महिलांच्या किंवा पुरुषांच्या ग्रुपसाठी, ऑफिसच्या आउटिंगसाठी, कोणत्याही छोट्यामोठ्या ग्रुपसाठी किंवा एखादा प्रसंग साजरा करण्यासाठी हे होम स्टे अत्यंत सोयीस्कर आहे. तर मुंबईपासून अवघ्या दीड दोन तासांच्या अंतरावर असलेल्या बीच अँड ब्लिस या सुंदर होम स्टेचा अनुभव घेण्यासाठी खालील क्रमांकावर जरूर संपर्क साधा. विशेष आभार: बीच अँड ब्लिस (होम स्टे बुकिंग) चिंचणी समुद्रकिनारा ९१३६०४३२३१ | ९८२०४३१४६७ वाणगाव स्थानक ते चिंचणी रिक्षासाठी शाहरुख भाऊ ७८७५४२५८४५ छायाचित्रण व संकलन: अनिशा डिमेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. यू ट्यूब शॉर्ट्स चॅनल    / @sunildmelloshorts   व्हॉट्सॲप चॅनल https://whatsapp.com/channel/0029VaBg... फेसबुक   / sunildmellovideos   इन्स्टाग्राम   / sunil_d_mello   #travel #sunildmellotravel #sunildmello #homestay #beachandbliss #beach #chinchani #chinchanibeach #vangaon #sunildmellovasai #sunildmelloshorts #sunildmellovideos #marathi #marathivlogs