🌺 ज्येष्ठा कनिष्ठा गौरी आवाहन | गौराई आगमन, पूजन, फुलोरा,16 प्रकारचा नैवेद्य |Mahalakshmi full Vlog
Div's Life and diaries
0:00 / 0:00
🌺 ज्येष्ठा कनिष्ठा गौरी आवाहन | गौराई आगमन, पूजन, फुलोरा,16 प्रकारचा नैवेद्य |Mahalakshmi full Vlog
1 066 просмотров · 5 дней назад
Div's Life and diaries
291 подписчик
1 066 просмотров · 5 дней назад
🌺 ज्येष्ठा कनिष्ठा गौरी आवाहन | आमच्या घरच्या गौराईंचा सुंदर सोहळा 🌺
नमस्कार मंडळी! ❤️
आजच्या vlog मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आमच्या घरच्या ज्येष्ठा-कनिष्ठा महालक्ष्मी अर्थात गौराईंचा अडीच दिवसांचा सुंदर सोहळा. 🙏🏻🌺
पावसाच्या सुंदर सरींनी झालेली दिवसाची सुरुवात, गौराईंच्या आगमनासाठी केलेला सुंदर फुलोरा, करंजी-पात्यांची तयारी, समुद्राची परंपरा, तुळशी वृंदावनाजवळ केलेलं गौरी आवाहन आणि त्यानंतर आपल्या गौराईंचा सुंदर शृंगार… हे सगळं या vlog मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ❤️
गौराईंचं घरात आगमन झाल्यानंतर त्यांना कुंकवाचे शुभ ठसे उमटवून घरात स्थान दिलं, खणा-नारळाची ओटी भरली आणि भक्तिभावाने महालक्ष्मीची कथा वाचून घेतली.
गौराईंच्या पूजनामध्ये १६ या संख्येला असलेलं महत्त्व, १६ वेढ्यांचा धागा, पवते, भूमीपूजन आणि आरतीची सुंदर परंपराही तुम्हाला या vlog मध्ये पाहायला मिळेल.
दुसऱ्या दिवशी गौराईंची पूजा, रांगोळी, फुलोरा आणि खास १६ भाज्या, १६ चटण्या, १६ दिवे, १६ करंज्या अशा १६ संख्येच्या परंपरेने सजलेला नैवेद्याचा थाट… आणि घरातील सगळ्यांनी मिळून केलेली लगबग! ❤️
आणि तिसऱ्या दिवशी आपल्या माहेरवाशीण गौराईंना निरोप देताना केली जाणारी बेलपत्रांची सुंदर परंपरा आणि आरती याचीही झलक या vlog मध्ये आहे.
या अडीच दिवसांत घरात आलेला आनंद, भक्ती, प्रेम, उत्साह आणि आपल्या परंपरांचा सुंदर अनुभव तुम्हाला या vlog मधून नक्कीच आवडेल. 🌺
गौराई आपल्या प्रत्येकाच्या घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी घेऊन येवोत, हीच महालक्ष्मी चरणी मनापासून प्रार्थना. 🙏🏻❤️
व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍🏻 | Comment 💬 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा.
तुमच्या घरी गौराईंची कोणती खास परंपरा आहे, ते comment मध्ये नक्की सांगा. ❤️
पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर vlog मध्ये…
Until then… Stay Connected! ❤️
🌺 महालक्ष्मी मातेचा जयजयकार! 🌺
🙏🏻 गणपती बाप्पा मोरया! 🙏🏻
#ज्येष्ठाकनिष्ठागौरी #गौरीआवाहन #गौराई #महालक्ष्मी #महालक्ष्मीपूजन #गौरीपूजन #गौराईआगमन #GauriAvahan #GauriFestival #Mahalakshmi #MarathiVlog #MarathiYouTuber #MaharashtraFestival #GauriPujan #MahalakshmiVlog