परफेक्ट उकडीचे मोदक Masterclass | मोदक पुराण व ७० खास Tips | Ukdiche Modak Recipe
Vidhya Shinde
0:00 / 0:00
परफेक्ट उकडीचे मोदक Masterclass | मोदक पुराण व ७० खास Tips | Ukdiche Modak Recipe
18 271 просмотр · 4 недели назад
Vidhya Shinde
43,1 тыс. подписчиков
18 271 просмотр · 4 недели назад
मोदकाचा मास्टर क्लास
@vidhyashinde01
परफेक्ट उकडीचे मोदक Masterclass | मोदक पुराण व ७० खास Tips | Ukdiche Modak Recipe
परफेक्ट उकडीचे मोदक कसे बनवायचे? या व्हिडिओमध्ये मोदक पुराणाची अनोखी कथा आणि माझ्या वर्षांच्या अनुभवातून ७० पेक्षा जास्त खास Masterclass Tips सांगण्यात आल्या आहेत. नवीन शिकणाऱ्यांपासून ते अगदी परफेक्ट मोदक बनवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे.
In this Modak Masterclass video, learn the authentic Ukdiche Modak recipe with 70+ secret tips and tricks from my personal experience, along with the traditional Modak Puran story.
७० महत्त्वाच्या टिप्स (70 Tips):
मोदक पुराण: उकडीचे मोदक १००% परफेक्ट जमण्याचे खास अनुभव आणि ७० सिक्रेट्स!
१. तांदूळ कसा आणि कोणता निवडावा? (टिप्स १ ते ५)
टिप १: मोदक ८०% परफेक्ट बनणे हे तुम्ही कोणता तांदूळ वापरता आणि तो कसा दळला आहे यावरच अवलंबून असते.
टिप २: एकदम नवीन तांदूळ वापरू नका, तो खूप चिवट आणि अति-चिकट होतो.
टिप :३ एकदम जुना तांदूळही वापरू नका, त्याने पीठ सरसरीत होते आणि चिकटपणा राहत नाही.
टिप : ४ मोदकासाठी १ ते २ वर्षे जुना (मध्यम) तांदूळच सर्वोत्तम!
टिप ५: कोकणात शेतातला ताजा तांदूळ वापरतात, तर शहरात आंबेमोहर, इंद्रायणी, बासमती किंवा रेशनचा तांदूळ वापरला जातो.
टिप :६ रेशनच्या तांदळाचेही मोदक छान होतात पण चवीला थोडा फरक पडतो
टिप :७ सर्व तांदळाच्या पिंडीला पाण्याचे प्रमाण थोडाफार फरक असतो
टिप ८ (तांदळाचे गुणधर्म): आंबेमोहर: सुवासिक आणि मऊ असतो, पण महाग असल्याने विक्रीसाठी परवडत नाही.
टिप : ९ इंद्रायणी: अतिशय मऊ आणि चवदार होतो, पण त्याला जास्त सुवास नसतो.
टिप :१० इंद्रायणी तांदळाला थोडं पाणी कमी वापरावे
टिप : ११ बासमती: छान सुवासिक होतो, पण मोदक थंड झाल्यावर थोडे मोदकाचा कधी कधी चिरा पडतात
टिप १२: प्रत्येक तांदळाच्या प्रकारानुसार उकडीसाठी लागणाऱ्या पाण्याचे प्रमाण थोडे मागे-पुढे होते.
२. तांदूळ धुण्याची आणि वाळवण्याची योग्य पद्धत (टिप्स ६ ते १४)
टिप १३: कोणताही तांदूळ घ्या, तो स्वच्छ धुवूनच वापरा. धुतल्यामुळे पीठ मऊसूद येते आणि पीठ सरसरीत येत नाही
टिप : १४ तांदूळ धुताना हलक्या हाताने चोळून धुवा, म्हणजे त्यातील स्टार्च निघू जात नाही
टिप:१५ आणि पिठाचा चिकटपणा कमी होत नाही
टिप :१६ धुतल्यानंतर तांदूळ ५ मिनिटे चाळणीत ठेवा, जेणेकरून सर्व पाणी निथरून जाईल.
टिप :१७ तांदूळ सुकवणे हा मोदक मऊ होण्याचा मुख्य भाग आहे! पाणी निथरल्यावर कॉटनच्या कापडावर तांदूळ एकदम पातळ पसरवून वाळवा.
टिप :१८ (महत्त्वाची टिप): तांदूळ कधीही उन्हात वाळवू नका! उन्हात वाळवल्यास तांदूळ कडक होतो आणि पीठ सरसरीत येते.
टिप : १९ तांदूळ घरातच पंख्याखाली ३ ते ४ दिवस वाळवा.
टिप : २० तांदूळ उत्तम वाळवला तरच पीठ जास्त दिवस टिकते आणि अजिबात खराब होत नाही.
टिप : २१ चांगला वाळलेला तांदूळ दळल्यास ते पीठ २ महिने अगदी छान टिकते, त्याला बुरशी लागत नाही.
टिप : २२ पण पीठ जास्त काळ टिकवायचे म्हणून तांदूळ महिना-महिने वाळवत बसू नका.नाहीतर पीठ जाडसर येईल
टिप २३ (तांदूळ सुकल्याची ओळख): तांदळाचा दाणा दातात धरून चावून बघा; जर 'कट्' असा आवाज आला, तर तांदूळ दळण्यासाठी तयार आहे.
३. तांदूळ दळणे आणि परफेक्ट कॉम्बिनेश
टिप : २४ गिरणीतून/चक्कीवरून पीठ दळताना स्वतः तिथे उभे राहून, मोदकाचे तांदूळ दळणाऱ्या चक्कीतच दळून घ्या.
टिप : २५ मोदकाचे पीठ अगदी मैद्यासारखे मऊ आणि बारीक दळलेले असावे.
टिप : २६ व्यावसायिक विक्री (Business) करायची असल्यास किंवा सर्वांना परवडणारे पीठ हवे असल्यास तांदळाचे योग्य कॉम्बिनेशन वापरा.
टिप : २७ फक्त इंद्रायणी तांदूळ वापरल्यास पीठ मऊ, चिकट आणि लुसलुशीत येते; मोदक दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मऊ राहतात.
टिप : २८ मोदक सुवासिक हवे असतील तर इंद्रायणीत थोडा आंबेमोहर घाला.
टिप : २९ इंद्रायणी तांदूळ जास्त चिकट वाटत असेल, तर त्याचा चिकटपणा संतुलित (Balance) करण्यासाठी त्यात थोडा 'कोलम' तांदूळ मिक्स करा.
टिप : ३०जर फक्त इंद्रायणी तांदूळ वापरत असाल, तर उकड काढताना पाणी थोडे कमी वापरा.
४. उकड (उकड काढण्याची) अचूक पद्धत
टिप : ३१ उकडीसाठी १:१ (एकास एक) प्रमाण असले, तरी वाटीत पीठ जितके गच्च भरता त्यापेक्षा पाणी थोडे कमी घ्या. पाणी कमी पडले तर नंतर गरम पाण्याचा हात लावता येतो.
टिप ३२ (शुभ्र मोदक): उकड एकदम पांढरीशुभ्र होण्यासाठी पाण्यात थोडे दूध घाला (आणि तेवढेच पाणी कमी करा).
टिप : ३३ मोदकाची पारी चवदार लागण्यासाठी उकडीच्या पाण्यात चिमूटभर मीठ आणि चिमूटभर साखर नक्की घाला.
टिप : ३४ पाण्यात मीठ जास्त झाले तर उकड अति-चिकट होते, म्हणून मीठ फक्त चिमूटभरच टाका.
टिप : ३५ उकड मऊ होण्यासाठी पाण्यात एक छोटा चमचा तूप घाला.
टिप : ३६ पाण्याला उकळी आली की पीठ घाला. पीठ आणि पाणी चांगले एकजीव होईपर्यंत मंद गॅस चालू ठेवा. एकजीव झाल्यावर झाकण ठेवा गॅस बारीक करून दोन मिनिटे वाफ काढा गॅस बंद करा आणि १० मिनिटे झाकण ठेवून वाफ निघू द्या. झाकणावर आलेले पाण्याचे थेंब पिठात पडल्यामुळे उकड छान शिजते.
५. पीठ मळण्याची कला
टिप : ३७ उकड गरम गरम असतानाच मळून घ्या, म्हणजे पिठाच्या गुठळ्या पटकन मोडतात.
टिप : ३९ गरम गरम उकड पेला किंवा ग्लास घेऊन मळा म्हणजे हात भाजत नाही
टिप : ४० मळताना उकड थोडी सुकी वाटली, तर थंड पाऐवजी फक्त गरम पाण्याचा हात लावून पीठ मळा.
टिप : ४१ पीठ जितके चांगले मळाल, तितके मोदक सुंदर आणि कळ्या पडणारे होतात.
१ किलो चणाडाळीत किती पूरणपोळया होतात
• 1 Kg Chana Dal Puran Poli Recipe | १ किलो ...
#UkdicheModak #ModakRecipe #ModakMasterclass #MarathiRecipe #ModakTips #GanpatiBappaMorya #GaneshChaturthiSpecial #ModakPuran
00:00 - प्रस्तावना व मोदक पुराण
02:15 - उकड काढण्याची योग्य पद्धत
05:30 - परफेक्ट सारण बनवणे
09:10 - मोदकाला कळ्या पाडण्याच्या टिप्स
14:20 - मोदक वाफवण्याची योग्य वेळ