Mi Navyane Janma Ghete | Geet | Bandish by Vidhushi Asha Khadilkar | Vedashri Oak
Asha Khadilkar
0:00 / 0:00
Mi Navyane Janma Ghete | Geet | Bandish by Vidhushi Asha Khadilkar | Vedashri Oak
957 просмотров · 4 месяца назад
Asha Khadilkar
972 подписчика
957 просмотров · 4 месяца назад
विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने "सुरदासी " म्हणजेच विदुषी आशाताई खाडिलकर यांनी रचलेल्या बंदिशींची स्वरांजली त्यांच्या शिष्यवर्गातर्फे त्यांच्या youtube चॅनेल @surdasiasha यावर प्रसारित होतील. यात त्यांच्या निरनिराळ्या रागातल्या आणि तालातल्या ५० बंदिशींचा समावेश आहे. या बंदिशींचे प्रसारण प्रत्येक आठवड्यात एक अशा प्रमाणे होईल.
या पुढील काही भागात काही गाणी सादर होतील. आज म्हणजे ३१ मे २०२६ रोजी एक गीत पेश करताहेत वेदश्री खाडिलकर ओक
गीत : मी नव्याने जन्म घेते
ताल : रूपक
मी नव्याने जन्म घेते ।
ईश्वराच्या घन कृपेने ।
स्नेह प्रेमाच्या फुलांनी आज रसिका धन्य होते ।।ध्रु।।
शब्द माझे ना पुरेसे भावना या बोलण्याला ।
पांगळ्या माझ्या सुरांचे मी जरासे बोट धरते ।।१।।
वाटचालीतून इथवर पाप पुण्याचे आडाखे ।
दगड माझ्या सांचिताचे मी जरासे नीट रचते ।।२।।
साधनेला तेजरूपी शक्ती दे देवा मला तू ।
फिरून मजला नाद ब्राह्मी मी मला झोकून देते ।।३।।
बंदिशकार: विदुषी आशाताई खाडिलकर
गायिका: वेदश्री खाडिलकर ओक
तबला: अभय दातार
संवादिनी: अनंत जोशी
साउंड इंजीनियर: अमोल माटेगांवकर
वीडियो प्रोडक्शन: कन्नन रेड्डी, हेलाशीयस स्टूडियो