# उकडीचे मोदक अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे #
My Routine life
0:00 / 0:00
# उकडीचे मोदक अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे #
76 просмотров · 2 недели назад
My Routine life
109 подписчиков
76 просмотров · 2 недели назад
जितकं पिठ तितकेच पाणी घालायचं . पाण्यामध्ये चिमुटभर मीठ, आणि १ चमचा तूप घालून घ्यायचं. पाण्याला उकळी आली की मग तांदळाचे पीठ घालून ढवळून घ्यावे. ५ मि. झाकुन ठेवावे. नंतर सारणासाठी खोवलेल खोबरं , आणि गुळ बारीक चिरून घ्यावा . कढईमध्ये तीळ आणि खसखस भाजून घ्यायचं, भाजून झाल्यानंतर ते बाजूला काढून, गूळ विरघळून घ्यायचा. नंतर त्यामध्ये खोवलेलं खोबरं, आणि तीळ खसखस घालून मिक्स करून घ्यायचं. पाच मिनिट चांगले शिजवून घ्यायचं. सारण आपलं तयार झालं आहे ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं. आता तांदळाचे पीठ चांगलं मळून घ्यायचं , व्हिडिओमध्ये दाखवले आहे तसं, पाकळ्या करून घ्यायच्या. तीन बोटांच्या साहाय्याने वरून खाली पर्यंत पाकळी करून घ्यायची . सारण भरून घ्यायचं. जर हाताने पाकळ्या जमत नसतील, तर व्हिडिओमध्ये दाखवले आहे तसं साच्यामध्ये घालून केलं तरी चालेल. ज्यांना हाताने पाकळ्या जमत नाहीत, त्यांच्यासाठी हा साचा वापरून अगदी सोप्या पद्धतीने करता येतात. मोदक तयार झाल्यानंतर चाळणीला तूप लावून 10 मिनिट चांगलं वाफवून घेणे. आपले मोदक तयार झाले आहेत. तुपाची धार सोडून खाल्ल्यास खूप छान चव येते. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका