Перейти к содержимому

सायडोंगर प्रकल्प: झाडे कुठे लावली? की टोरेंटने पैसे भरून सुटका केली?

Vijay Kumbhar

0:00 / 0:00

सायडोंगर प्रकल्प: झाडे कुठे लावली? की टोरेंटने पैसे भरून सुटका केली?

3 815 просмотров · 2 дн. назад
Vijay Kumbhar
2,31 тыс. подписчиков
3 815 просмотров · 2 дн. назад
प्रश्न विचारला की प्रकल्पाला विरोध करतात म्हणून आरडाओरडा करायचा, ही जुनी खोड आहे! पण आमचा प्रश्न साधा आहे—सईडोंगर-I पंप्ड स्टोरेज प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीची भरपाई म्हणून वृक्षारोपण नेमके कुठे झाले? प्रत्यक्ष झाडे लावली आहेत का? की वृक्षारोपणाऐवजी पैसे भरून कंपनीने आपली जबाबदारी पूर्ण केली? महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सईडोंगर-I या 3,000 MW क्षमतेच्या पंप्ड स्टोरेज प्रकल्पासंदर्भात टोरेंट कंपनी आणि संबंधित शासकीय यंत्रणांना विचारायचे हे 11 महत्त्वाचे प्रश्न आहेत. या प्रश्नांमध्ये वनजमीन हस्तांतरण, वृक्षतोडीची परवानगी, भरपाईच्या वनरोपणासाठी निश्चित केलेली जमीन, CAMPA निधी, प्रत्यक्ष वृक्षारोपण, झाडांच्या जगण्याचे प्रमाण आणि वनमंजुरीच्या अटींच्या पालनाचा समावेश आहे. भरपाईच्या वनरोपणासाठी जमीन नेमकी कुठे आहे? त्या जमिनीवर वृक्षारोपण झाले आहे का? किती झाडे लावली आणि किती जगली? पर्यायी जमीन प्रकल्पाच्या जवळच्या परिसरात देण्यात आली आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे कागदपत्रांसह सार्वजनिक झाली पाहिजेत. विकासाला विरोध नाही; पण विकासाच्या नावाखाली पर्यावरणीय जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये. टोरेंट कंपनी आणि संबंधित सरकारी यंत्रणांनी या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे द्यावीत, हीच मागणी. आपले मत कमेंटमध्ये नोंदवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @vijaykumbharofficial ✒️ आपण ही आपल्या सूचना किंवा विशिष्ठ विषय आम्हाला kvijay14@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : /  / kvijay14   ➡️ Twitter : / https://x.com/VijayKumbhar62 ➡️ Instagram : /   / vijaykumbhar62