Перейти к содержимому

Congress कडून दहा दिवसांसाठी Ramlila Maidan बूक, Rahul Gandhi आंदोलनासाठी मोठं प्लॅनिंग करतायत ?

BolBhidu

0:00 / 0:00

Congress कडून दहा दिवसांसाठी Ramlila Maidan बूक, Rahul Gandhi आंदोलनासाठी मोठं प्लॅनिंग करतायत ?

113 626 просмотров · 1 дн. назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
113 626 просмотров · 1 дн. назад
#BolBhidu #RamlilaMaidan #RahulGandhi दिल्लीचं रामलीला मैदान. या मैदानाला ऐतिहासिक मैदान म्हटलं जातं. त्याचं कारण म्हणजे या मैदानाला असलेला आंदोलनांचा इतिहास. स्वातंत्र्यलढ्यापासून ते आणीबाणीविरोधी संघर्षापर्यंत रामलीला मैदानावर अनेक आंदोलनं झाली. २०११ ला अण्णा हजारेंचं भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, रामदेव बाबांचं काळ्या पैशांविरोधातलं आंदोलन ही दोन्ही आंदोलनं चांगलीच गाजली. २०१४ मध्ये देशात सत्ताबदल होण्यात या आंदोलनांचा मोठा वाटा होता, असं कायम म्हटलं जातं. आता हेच रामलीला मैदान पुन्हा एकदा चर्चेत आलंय ते इथे होणाऱ्या आंदोलनामुळेच. पण हे आंदोलन कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्याचं किंवा संघटनेचं नाही, हे आंदोलन आहे काँग्रेसचं. देशातल्या सगळ्यात मोठ्या विरोधी पक्षाचं. २५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर असे सलग १० दिवस रामलीला मैदाना काँग्रेससाठी आरक्षित ठेवण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांकडून याबाबत अधिकृत परवानगी काँग्रेसला देण्यात आली आहे. १ नोव्हेंबरला काँग्रेसकडून रामलीला मैदानात मोठी सभा घेण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय. पण एक दिवसाच्या सभेसाठी काँग्रेसने १० दिवसांची परवानगी मागितल्यामुळे यामागे राहुल गांधींचा नक्की प्लॅन काय आहे, असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय. सभेच्या तयारीसाठी काँग्रेसने इतके दिवस रामलीला मैदान बूक केलंय की रामलीला मैदानात तळ ठोकण्याचा राहुल गांधींचा प्लॅन आहे, अशा शक्यता आता वर्तवण्यात आल्या आहेत. नेमकं घडतंय काय, रामलीला मैदानावर आंदोलनाचा काँग्रेसचा प्लॅन नक्की काय असू शकतो, पाहुयात या व्हिडिओमधून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/