अदानींचा फोटो कायम, Rahul Gandhi यांच्या Destroyers of Democracy पोस्टरमधून Ambani गायब, काय बदललं?
BolBhidu
0:00 / 0:00
अदानींचा फोटो कायम, Rahul Gandhi यांच्या Destroyers of Democracy पोस्टरमधून Ambani गायब, काय बदललं?
50 034 просмотра · 7 часов назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
50 034 просмотра · 7 часов назад
#BolBhidu #RahulGandhi #Ambani
लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी. त्यांनी या सरकारवरती जेव्हा-जेव्हा आरोप केले, तेव्हा-तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबरच उद्योगपती अदानी आणि अंबानी यांचंही नाव घेतलेलं आहे. आता अलिकडेच राहुल गांधी यांनी दिल्ली मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरती व्होटचोरीचे आरोप करताना एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. यावेळी त्यांनी स्टेजवर एक पोस्टर ठेवलं होतं. त्यावर लिहिलं होतं, Destroyers of Democracy. या बॅनरखाली देशातल्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे फोटो होते. मात्र यावेळी या पोस्टरवरून एक नाव गायब होतं, ते म्हणजे उद्योगपती मुकेश अंबानी यांचं. विशेष म्हणजे, फक्त पाच दिवसांपूर्वी, इंदौरमधल्या छात्रों की गूंज या कार्यक्रमात राहुल गांधींनी दाखवलेल्या पोस्टरवर गौतम अदानींच्या जोडीला मुकेश अंबानी यांचं नाव आणि फोटो अगदी स्पष्टपणे दिसला होता. मात्र २४ सप्टेंबरच्या पत्रकार परिषदेत अंबानी यांचं नाव गायब होतं. त्यामुळे प्रश्न पडतो की, राहुल गांधी यांच्या लिस्टमधून अचानक मुकेश अंबानी यांचं नाव गायब कसं झालं? यामागे नवीन कॉर्पोरेट आणि राजकीय गणितं शिजत आहेत का? राजकीय परिस्थिती बदलताना अंबांनीसारखे उद्योजक आपले संबंध संतुलित करतायेत का? सगळी स्टोरी जाणून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/