मऊ मऊ पुरणपोळी आणि त्यावर साजूक तुपाची धार, Easy puranpoli recipe
mayuri bhamare
0:00 / 0:00
मऊ मऊ पुरणपोळी आणि त्यावर साजूक तुपाची धार, Easy puranpoli recipe
391 просмотр · 8 дней назад
mayuri bhamare
473 подписчика
391 просмотр · 8 дней назад
पुरणपोळी करण्याची साधी सोपी पद्धत
साहित्य
हरभरा डाळ -1 कप
गुळ -1 कप
गव्हाचे पीठ - 1.5 कप
मैदा - अर्धा कप
मीठ - अर्धा टेबलस्पून
हळद - पाव टेबलस्पून
तेल -1 टेबलस्पून
तूप
1 कप डाळ धुवून कुकर मध्ये 8 शिट्ट्या करून शिजवून घ्यायची. शिजताना 3 कप पाणी आणि थोडी हळद घालायची. दाळ शिजेपर्यंत कणिक मळून घ्यायची. 1.5 कप गव्हाचे पीठ व अर्धा कप मैदा घ्यायचा त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे, 1 चमचा तेल घालून छोटा पाव चमचा हळदीच्या पाण्यात कणीक मळून घ्यायची. कणीक 20 मिनिटांसाठी मुरू द्यायची. तोपर्यंत डाळ सुद्धा मऊसूद शिजली आहे. डाळीमधल पाणी काढून ती कढई मध्ये घालायची.त्यामध्ये गुळ मिसळून गॅस वर मोठ्या आचेवर गुळ वितळून घ्यायचा आहे,मिश्रण सतत हलवत रहायचे आहे 10 मिनिटात पुरण तयार होते. आता कणिक सुद्धा चांगल मुरले आहे आणि चांगले लवचिक कणिक तयार झाले आहे. तर व्हिडिओ मध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे पुरणपोळी लाटून व शिजवून घ्यायची.भरपूर असे तूप घालायचे. दूध, खीर, आमटी बरोबर खीर खाऊ शकता.
#पुरणपोळी #PuranPoli #PuranPoliRecipe #मराठीरेसिपी #MarathiRecipe #MaharashtrianFood #MaharashtrianRecipe #घरीबनवलेलीपुरणपोळी #HomemadePuranPoli #TraditionalRecipe #IndianFood #SweetRecipe #FestiveRecipe #RecipesByMayuri