उपवासाचे healthy बदाम शेक.
#Sunita Cooking
0:00 / 0:00
उपवासाचे healthy बदाम शेक.
38 просмотров · 3 дня назад
#Sunita Cooking
79 подписчиков
38 просмотров · 3 дня назад
उपवासाचे हेल्दी ड्रिंक | बदाम शेक
🥛 साहित्य
अर्धा लिटर दूध
१० ते १२ बदाम
२ चमचे कस्टर्ड पावडर
२ चमचे थंड दूध (कस्टर्ड पावडर मिक्स करण्यासाठी)
बदामाचे बारीक काप
काजूचे बारीक काप
वेलची पावडर आवश्यकतेनुसार
साखर चवीनुसार (ऐच्छिक)
👩🍳 कृती
1. सर्वप्रथम बदाम ४ ते ५ तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर बदामाचे साल काढून घ्या.
2. बदाम थोडे दूध घालून मिक्सरमध्ये बारीक, एकजीव पेस्ट करून घ्या.
3. अर्धा लिटर दूध व्यवस्थित उकळून घ्या.
4. उकळत्या दुधात बदामाची पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करा.
5. दोन चमचे थंड दुधामध्ये कस्टर्ड पावडर गुठळ्या न राहता मिक्स करून घ्या. हे मिश्रण उकळत्या दुधात हळूहळू घाला आणि सतत ढवळत राहा.
6. त्यानंतर बदामाचे आणि काजूचे बारीक काप घाला. दूध थोडे घट्ट होईपर्यंत शिजवा.
7. गॅस बंद केल्यानंतर वेलची पावडर घालून मिक्स करा.
8. अशा प्रकारे तयार आहे आपला चविष्ट बदाम शेक! हा गरम किंवा थंड करून सर्व्ह करू शकता.
#BadamShake #HealthyDrink #उपवासाचेहेल्डीड्रिंक #BadamMilkshake #MarathiRecipe #FastingRecipe #AlmondShake #EasyRecipe