देवी आईचा गोंधळ...
SwaraSetu
0:00 / 0:00
देवी आईचा गोंधळ...
6 656 просмотров · 9 дн. назад
SwaraSetu
186 подписчиков
6 656 просмотров · 9 дн. назад
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांना गोंधळाचं आवताण.."देवी आईचा गोंधळ"
गीत: स्मिता श्रीपाद
संगीत: सायली जोशी
संगीत संयोजन: ओंकार साठे
गायक: विवेक सुतार
कोरस: सायली जोशी, स्मिता श्रीपाद, ओंकार साठे
वाद्यवृंद
संवादिनी: ओंकार साठे
संबळ, दिमडी आणि ढोलकी: मंगेश जोशी
कि-बोर्ड: प्रांजल अक्कलकोटकर, ओंकार साठे
रेकॉर्डिंग आणि मिक्सिंग:
अवधूत रहाळकर ( Euphony Recording Studio, पुणे )
व्हिडीओ संकलन: ओंकार साठे
विशेष सहाय्य: सुचेता परांजपे, प्रज्ञा प्रभुदेसाई, उमा कुलकर्णी, अपूर्वा जोशी, हरीश पाचंगे(गोंधळी)
आभार: ज्ञान प्रबोधिनी पालक अभिव्यक्ती गट
गीत:-
उभा गोंधळी तुझिया दारी
लेकराला पाव गं
दूर सारण्या गोंधळ मनीचा
आई माऊली धाव गं
करवीर नगरी धान्य जाहली
रूप पाहुनि लक्ष्मीचे
सावर मजला अंबाबाई
दान देई तव तेजाचे
डोळ्यामध्ये तुझीच मूर्ती,ओठी तुझेच नाव गं
दूर सारण्या गोंधळ मनीचा अंबाबाई धाव गं
तुळजापूरच्या दरबारी
नेसून शालू जरतारी
भव्य मंचकी दिसे शोभुनी
आई भवानी ची स्वारी
उदो उदो चा गजर निनादे, तल्लीन सारा गाव गं
दूर सारण्या गोंधळ मनीचा आई भवानी धाव गं
प्रकट जाहली जगदंबा
माहूर गडावरती
आई रेणुका जणू भासते
आदिशक्ती पार्वती
मशाल दिवटी धरली हाती, पुढला रस्ता दाव गं
दूर सारण्या गोंधळ मनीचा रेणुकाई धाव गं
वणी गडावर बसली दुर्गा
भव्य देखणे रूप तिचे
रक्षण करती अठरा बाहू
संकट हरती भक्तांचे
तिला पाहुनि निवले डोळे, हृदयी भक्तीभाव गं
दूर सारण्या गोंधळ मनीचा सप्तशृंगी तू धाव गं
-©️स्मिता श्रीपाद